Rice Farming: शेतात भरली 'आजोबांची शाळा', 80 वर्षीय मनू कुंडईकरांकडून 77 विद्यार्थ्यांना 'भात लागवडी'चे धडे, शिक्षकवर्गही मदतीसाठी सरसावला

Rice Farming Education: सांतइस्तेव परिसरात ८० वर्षीय आजोबांनी ७७ विद्यार्थ्यांना भात लागवडीचे धडे दिले. भाताचा तरवा लावण्यापासून ते त्या रोपाची लागवड, त्यांची देखभालीबाबत धडे दिले.
Rice Farming
Rice FarmingDainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: सांतइस्तेव परिसरात ८० वर्षीय आजोबांनी ७७ विद्यार्थ्यांना भात लागवडीचे धडे दिले. भाताचा तरवा लावण्यापासून ते त्या रोपाची लागवड, त्यांची देखभाल, कोणत्या वेळी कोणते खत द्यायचे, पाण्याची गरज किती? या गोष्टींपासून ते मळणीपर्यंतच्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष शेतात मनू कुंडईकर (आजोबा) यांनी सेंट तेरेझा हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षिकांना सांगितल्या. तेव्हा विद्यार्थी व शिक्षकवर्गही उत्साहाने त्याच्यासोबत लावणी केलेल्या शेतात त्यांना मदत करण्यास पुढे सरसावला.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना शेती, बागायतीबाबत प्रत्यक्ष कार्यातून माहिती देणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळांतर्फे विद्यार्थ्यांना शेतात नेले जाते. सेंट तेरझा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका लिब्रेटा फर्नांडिस, शिक्षिका अंतोनिया डायस, पॅट्रीशिया फर्नांडिस यांनी दहावीच्या ७७ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मनू कुंडईकर यांच्याकडून धडे दिले.

तेव्हा विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे भात लागवडीबाबत माहिती घेतली आणि घरी, शाळेत किचन गार्डन करण्याचा संकल्प सोडला. यावेळी विद्यार्थ्यांना लक्ष्मी व विष्णू गावडे यांच्याकडूनही शेतीविषयक माहिती मिळाली.

Rice Farming
Goa Fake Police: तोतया पोलिसांचा सुळसुळाट; भरदिवसा दोघांचे दागिने हातोहात लंपास, ज्‍येष्‍ठांसह महिला 'टार्गेट'वर

सांतइस्तेव परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात भात लागवड केली जाते. पाणी पुरवठाही मुबलक असतो, त्यामुळे भातशेती उत्तम पिकते. येथे ‘ज्योती’ जातीच्या आधुनिक भात रोपांची लागवड करण्यात आली आहे.

मनू कुंडईकर लहान वयापासून शेती व्यवसायात आहेत. गेली किमान सहा-सात दशके ते शेतात वेगवेगळी पिके घेतात. ते भात लागवड करतात ती शेती त्यांच्या मालकीचीही नाही, परंतु ते नियमितपणे मालकाच्या परवानगीने शेती करतात. शेतीसाठी लागणार मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, तरीसुद्धा आपल्या परिवारातील लोकांच्या सहकार्याने ते शेती करतात.

भाजीपालाही मुबलक! मनू कुंडईकर पावसाळी शेती पिकल्यानंतर वायंगण शेती करतात. त्यावेळी वाल, भेंडी, मिरची, लालभाजीची लागवड करतात. त्यामुळे सांतइस्तेव-माशेलसारख्या परिसरात स्थानिक भाजी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. येथील भाजी चवदार असते.

मनु कुंडईकर सारखे अवघेच शेतकरी या भागात कार्यरत असूनही भाजी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.

भेंडी, मिरची लावणार!

भात लागवडीचा अनुभव घेतल्यानंतर ७७ विद्यार्थी ३ शिक्षिकांनी 80 किचन गार्डन तयार करण्याच संकल्प केला. या गार्डनमध्ये मिरची, भेंडी, टोमॅटोची लागवड करणार आहोत. तसेच शाळेच्या परिसरातही विद्यार्थ्यांनी कृषी संस्कृतीची ओळख होण्यासाठी काही भाज्यांची लागवड करणार असल्‍याचे मुख्याध्यापिका लिब्रेटा फर्नांडिस यांनी सांगितले.

Rice Farming
Goa Crime: मध्यरात्री 'ड्रग्ज'प्रकरणी युवकाला अटक, 228 ग्रॅम गांजासह स्कूटर-मोबाईल जप्त; शिरगावात कारवाई

तरुणाईपेक्षा सरस!

शेती कामात चपळता असावी लागते. शेतीचा मशागत करताना काही कामासाठी तरुणाची गरज असत. नांगरणीच्या वेळी गतीने काम करण्यासाठी युवावर्गाची गरज असूनही आज युवा वर्ग काहींसा शेतात उतरत नाही.

परंतू ८० वर्षीय मनू कुंडईकर तरूणाईपेक्षाही सरस ठरत आहेत. ते न थकता, ऊन, पाऊस, थंडीतही शेतात काम करतात. शेती हेच आपले दैवत असून येथेच सोने पिकते, ते आपल्याला वर्षभर पुरते असे, ते अभिमानाने सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com