Margao News : ५ महिन्यांत ८ चोऱ्या; काणकोण, कुंकळ्‍ळीत चोरट्यांचा सुळसुळाट

Margao News : लाखोंचा ऐवज खुणावतो ः होते रेकी; निर्जन वेळा पथ्यावर
Margao
Margao Dainik Gomantak

सुशांत कुंकळयेकर

Margao News :

मडगाव, दामोदर साल मंदिरात तीन महिन्‍यांपूर्वी चोरीची घटना घडली असली तरी ती आता उघड झाल्‍याने पुन्‍हा एकदा गोव्‍यातील मंदिरांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. लाखो रुपयांचा ऐवज असणाऱ्या या देवळांना पुरेशी सुरक्षा असते का, हा प्रश्‍न चर्चेत आला आहे.

मागच्‍या पाच महिन्‍यांत गोव्‍यात तब्‍बल आठ मंदिरांत चोरीच्‍या घटना घडल्‍या असून मूर्ती विटंबनेच्‍याही तीन घटनांची नोंद झाली आहे. यामुळे गोव्‍यातील देव सुरक्षित आहेत का, हा प्रश्‍न सामान्‍यांकडून विचारला जात आहे. यातील तीन चोऱ्यांचा तपास लावण्‍यास पोलिसांना अजूनही यश आलेले नाही.

मडगावच्‍या दामोदर साल मंदिरातील चोरीची घटना आता उघडकीस आली असली तरी यंदाची ही मंदिर चाेरी मालिकेतील पहिली घटना असून १० फेब्रुवारी रोजी भर दिवसा एका अज्ञाताने मंदिरात प्रवेश करून देवाच्‍या अंगावरील सुमारे एक लाख रुपयांचे अलंकार पळविले होते. मात्र, या प्रकरणातील चोरटा कालच फातोर्डा पोलिसांच्‍या हाती लागला.

Margao
Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

गोव्‍यातील प्रसिद्ध अशा म्‍हापसा येथील श्री बोडगेश्‍वर मंदिरात दोनवेळा चोरीच्‍या घटना घडल्‍या. २७ फेब्रुवारी रोजी रात्री या मंदिरातील फंडपेटी फोडण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याच्‍या आरोपाखाली पोलिसांनी सागर शिंदे व आनंद नाईक या हमाली करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना अटक केली हाेती.

यावेळी मंदिरातून फार मोठा ऐवज चोरीला गेला नव्‍हता. मात्र २९ मार्च रोजी याच मंदिरात मोठा दरोडा पडला. या मंदिरातील दोन फंडपेट्या चोरट्यांनी पळवून सुमारे १२ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणात हल्‍लीच म्‍हापसा पोलिसांनी महाराष्‍ट्रातून चारजणांना अटक करून आणले होते. त्‍यांच्‍याकडून सहा लाखांचा ऐवज जप्‍त केला.

३ मार्च रोजी आगोंद-काणकोण येथील प्रसिद्ध असे आगोंदेश्‍वर मंदिर अशाच अज्ञात चोरट्यांनी फोडून सहा मोठ्या समया, दोन घंटा आणि राेख असा सुमारे दोन लाखांचा ऐवज पळवून नेला होता.

मंदिराच्‍या कडेच्‍या बाजूला असलेला दरवाजा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून ही चोरी केली हाेती. ही घटना होऊन जवळपास अडीच महिने उलटले तरी अजून या चाेरीचा तपास लागलेला नाही.

२८ मार्च रोजी दुर्भाट-फोंडा येथील श्री साईबाबा मंदिर फोडून सुमारे ५० हजारांची रोकड पळविली हाेती. ११ मे रोजी सांगे येथील विठ्ठल मंदिरात झालेल्‍या चोरीत सुमारे ५० हजारांचे चांदीचे दागिने लंपास करण्‍यात आले होते. तर १७ मे रोजी सांताक्रुझ-पणजी येथील ताडमाड शिव देवस्‍थान या घुमटीवजा देवस्‍थानातील पैशांची पेटी फाेडण्‍याची घटना घडली होती.

मात्र, त्‍यात नेमका कितीचा ऐवज चाेरीला गेला याची माहिती कळू शकलेली नाही. मे महिन्‍यात झालेल्‍या दोन्‍ही मंदिर चाेरी प्रकरणांतील तपास अजून लागलेला नाही.

पोलिसांकडून रात्रीची तसेच दिवसा गस्त घातली जाते. वेळोवेळी पोलिसांकडून मंदिर व्यवस्थापन, सदनिका तसेच लोकांना खबरदारी घेण्याबाबत आवाहन केले जाते.

राज्यात चोऱ्यांचे सत्र भरपूर वाढले आहे. चोरटे आता प्रसिद्ध अशा

देवस्थानांना लक्ष्य करू लागले आहेत. ज्या मंदिरांतील फंडपेट्यांमध्ये

मोठ्या प्रमाणात पैसा जमा होतो त्या मंदिरांना हेरून हे चोरटे चोरी करू लागले आहेत.

हे करताना त्यांच्या मनात देवाबद्दलची भीती किंचितही नसावी. या सर्वातून

मात्र मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहे.

काय करावे म्हणजे या चोरट्यांना जरब बसेल, त्या विचारात

राज्याची पोलिस यंत्रणा आहे.

काणकोण, कुंकळ्‍ळीत चोरट्यांचा सुळसुळाट

फक्‍त देवस्‍थानेच नव्‍हे तर काणकोण व कुंकळ्‍ळी भागात चोरट्यांनी लाेकांची घरेही लक्ष्‍य केल्‍याचे दिसून आले आहे. काणकाेण परिसरात घरफोडीच्‍या तीन घटना घडल्‍या असून या तिन्‍ही घटनांचा अजून तपास लागलेला नाही. काणकोणला जवळ असलेल्‍या कुंकळ्‍ळी पोलिस स्‍थानकाच्‍या कक्षेतही तीन घरफोडीच्‍या घटनांची नोंद झाली आहे. या तिन्‍ही चोऱ्यांचाही अजून तपास लागलेला नाही.

मूर्ती विटंबनेच्‍या तीन घटना

मागच्‍या पाच महिन्‍यांत मूर्ती आणि श्रद्धास्‍थळांच्‍या विटंबनांच्‍या तीन घटना घडल्‍या असून त्‍यातील पहिली घटना ८ फेब्रुवारी राेजी कुडचडे येथील सातेरी देवस्‍थानात घडली. देवळाच्‍या बाहेर ज्‍या मूर्ती आहेत त्‍यांची एका इसमाने विटंबना केली. पोलिस तपासात हा इसम काम नसल्‍याने वैफल्‍यग्रस्‍त झाला होता आणि त्‍या वैफल्‍यग्रस्‍तेतूनच त्‍याने हे कृत्‍य केल्‍याचे

२३ फेब्रुवारी रोजी खड्डे-बार्शे येथील घुमटीतील दोन मूर्तीची विटंबणा करण्‍यात आली होती. हा इसमही काहीसा मनोरुग्‍ण स्‍वरूपाचा हाेता, अशी माहिती पाेलिसांकडून मिळाली. २७ मार्च रोजी आल्‍तिनो येथे एका वेडसर इसमाकडून एका क्राॅसची विटंबना करण्‍यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com