
वाळपई: शिंगणे पिसुर्ले येथे 75 वर्षीय महिला विहीरीत पडल्याच्या घटनेने शुक्रवारी (14 फेब्रुवारी) दुपारी एकच खळबळ उडाली. मात्र, अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून महिलेचे प्राण वाचवले. मंजिरी पळ्येकर असे या 75 वर्षीय महिलेचे नाव आहे.
दरम्यान, मंजिरी या विहीरीत कशा पडल्या याची माहिती मिळू शकली नाही. मात्र या घटनेविषयी अग्नीशमन दलाला कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मंजिरी यांना विहीरीतून सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले. मंजिरी यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. विहीरीत भरपूर पाणी होते.
अग्निशमन दलाचे श्रीकांत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अदम खान, गंगाराम पावणे, संदीप गावकर, रोहन कर्पे आदी जवानांनी मदत कार्य केले. शिडी आणि दोरीच्या सहाय्याने मंजिरी यांना विहीरीतून सुखरुप काढण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.