Garbage Problem: कचरा संकलनाचे कंत्राट 6.73 कोटींचे?

Garbage Problem: कचरा संकलनाचे कंत्राट 6.73 कोटींचे?
Garbage Problem
Garbage ProblemDainik Gomantak
Published on
Updated on

Garbage Problem: मडगाव नगरपालिकेचा कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चाललेली असताना पालिकेने दारोदारी कचरा संकलन करण्याचे कंत्राट 6.73 कोटी रुपयांना देण्याचे निश्र्चित केल्याचे कळते.

मात्र, या कंत्राटावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी नगरसेवक एकत्र बसून चर्चा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मडगाव कचऱ्याचा व बायो मिथनेशन प्लांटचा प्रश्र्न विधानसभेतही चर्चेला आला होता.

प्रश्र्न हा आहे की, ज्या कंत्राटदाराला हे कंत्राट देण्यात येईल त्याने निविदेतील सर्व अटी मान्य केल्या आहेत का? निविदेत एक अट अशी आहे की कंत्राटदाराने केवळ दारोदारीच नव्हे तर रस्त्यालगतचा तसेच खुल्या जागेतील कचरा उचलावा.

Garbage Problem
Mhadei River: म्हादईप्रश्‍नी तूर्त निराशाच; पुढील सुनावणी 5 ऑगस्टला

त्याचबरोबर काहींनी हाही प्रश्र्न उपस्थित केला आहे की, निविदेत सांगितल्याप्रमाणे कंत्राटदार तेवढ्याच सफाई कामगाराची नियुक्ती करतो की कमी कामगारांची नियुक्ती करतो?

काही नगरसेवकांचे म्हणणे आहे की दारोदारी कचरा उचलण्यासाठीचा भार पालिकेवर न पडता तो खर्च १४व्या १५व्या वित्त आयोगामार्फत आलेल्या अनुदानातून केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com