धारगळ येथे अपघातात महाराष्‍ट्रातील 5 जखमी

कारने ट्रकला मागाहून दिली जोरदार धडक
Goa Accident Death
Goa Accident DeathDainik Gomantak

पेडणे: ओशेलबाग-धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे पाचच्‍या सुमारास कारने उभ्‍या असलेल्‍या ट्रकला मागून धडक दिल्‍यामुळे झालेल्‍या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. जखमी झालेले सर्वजण महाराष्‍ट्रातील आहेत. जखमींना उपचारांसाठी इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे.

(5 injured in Maharashtra accident at Dhargalim)

Goa Accident Death
राज्यात फ्रंटलाइन कर्मचार्‍यांचे बूस्टर डोस लसीकरण समाधानकारक नाहीत!

मिळालेल्‍या माहितीनुसार, महामार्गाच्या बाजूला उभ्‍या करून ठेवलेल्‍या ट्रकला (जीए-03-टी-7284) मागून फॉर्चुनर कारने (एमएच-07-क्यू-9005) जोरदार धडक दिली. त्‍यात कारमधील विक्रम प्रकाश मोरजकर, हिमांशु कुशी (दोघेही रा. मालवण) व तन्मय खानोलकर (अंधेरी) हे गंभीर जखमी झाले.

पहिले दोघे म्हापसा येथे खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत तर तन्‍मय याला गोमेकॉत उपचार घेतल्‍यानंतर आज संध्‍याकाळी डिस्‍चार्ज देण्‍यात आला. सागर पडवळ (देवगड) व व रौनक देसाई (मालाड) या कारमधील अन्‍य दोघांना किरकोळ दुखापत झाली. अपघातात कारचा मात्र चुराडा झाला.

Goa Accident Death
‘इंटिग्रेटेड बीच मॅनेजमेंट प्लॅन’ लवकरच: रोहन खंवटे

बागा-कळंगुट येथून हे पाचही जण ओरोस-कुडाळच्‍या दिशेने जात होते. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. दरम्‍यान, या मार्गावर अपघात वाढल्‍याने लोकांमध्‍ये चिंता व्‍यक्त करण्‍यात येऊ लागली आहे.

अग्निशमन दलाकडून जखमींची सुटका

अपघातानंतर चालक हिमांशु कुशी व तन्मय खानोलकार हे कारमध्‍येच अडकून पडले होते. पेडणे अग्निशामक दलाच्‍या जवानांनी घटनास्‍थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले व इस्‍पितळात दाखल केले. दलाचे साहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रदीप आसोलकर, चालक प्रमोद गवंडी, जवान अमोल परब, अमित सावळ, संदेश पेडणेकर, विकास चौहान, राजेश परब, यशवंत नाईक यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com