नेत्रावळीत 48 तास ‘शट डाऊन’

तीव्र संताप; बिघाड सापडत नाही : वीज कर्मचारी
Goa Electricity
Goa ElectricityDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: नेत्रावळीत पहिल्याच पावसात वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सलग 48 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने स्थानिकांचे हाल झाले. वीज कर्मचाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता नेमका बिघाड कुठे झाला, हे सापडत नसल्याचे उत्तर दिले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

(48 hours Electricity problem in netravali)

Goa Electricity
पेट्रोलचे कर कमी करता येतात तर...?

वीज खंडित होताच पाणीपुरवठा ठप्प होतो, मोबाईल सेवा ठप्प होते तसेच विजेवर अवलंबून व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे महिलावर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मॉन्सूनपूर्व पावसात नेत्रावळी सलग दोन दिवस अंधारात राहिली. भुयारी वीज प्रकल्प अद्याप पूर्ण झालला नाही. गेली चार वर्षे हा प्रकल्प रखडत असल्याने पावसाळ्यात वारंवार अशा घटना घडत असल्याचे सांगण्यात येते.

सांगेवासीयांना मूलभूत गरजांपैकी वीज, पाणी, आणि नेटवर्क या गोष्टी अजूनही मिळालेल्या नाहीत. त्या देण्याची मागणी आम्ही अनेकवेळा केली. आमचा कोणत्याच प्रकल्पाला विरोध नाही; पण जनतेला सुविधा मिळाव्यात, हीच अपेक्षा आहे.

- राखी प्रभुदेसाई नाईक, स्थानिक

मॉन्सूनपूर्व पावसात जर नेत्रावळीतील विजेची ही परिस्थिती असेल तर पुढील चार-पाच महिने जनतेने काय करावे? जवळच्या विचुन्द्रे गावात वीजपुरवठा असताना नेत्रावळीत वीजपुरवठा खंडित असल्याचा ‘फॉल्ट’ कर्मचाऱ्यांना सापडत नाही, मग वीज खात्याने कोणती सुधारणा केली, असा प्रश्‍न पडतो. - सुदेश नाईक, स्थानिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com