37th National Games Goa: राष्ट्रीय स्पर्धेला मनोरंजनाचाही तडका; कांपाल भागात होणार गर्दी

वाहतूक व्यवस्थेवर राहील करडी नजर
CM PRamod Sawant
CM PRamod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa CM Pramod Sawant: गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कालावधीत कांपाल परिसर सर्वाधिक गजबजलेला असेल. इतर केंद्रांपेक्षा येथे जास्त गर्दी असेल, त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही चोख ठेवण्यास बजावण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी दिली.

कांपाल येथील क्रीडानगरीत केवळ क्रीडा चुरस नसेल, तर संध्याकाळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही येथे होतील. खेळाबरोबर मनोरंजनही होईल. जेणेकरून अधिकाधिक लोकांनी क्रीडानगरीस भेट द्यावी हा यामागचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

त्यांनी गुरुवारी कांपाल येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम, जलतरण तलाव संकुल यांना भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी सर्वाधिक १३ खेळांचे आयोजन होणार आहे.

भव्य तंबू उभारून कांपाल मैदानावर क्रीडानगरी साकारण्यात येणार आहे. कांपाल येथील पहिली स्पर्धा (नेटबॉल) २६ रोजीच्या उदघाटनापूर्वी २२ ऑक्टोबरपासून खेळली जाईल. कांपाल परिसरात स्पर्धा कालावधीत एकूण १४ खेळांचे आयोजन होईल.

CM PRamod Sawant
Goa Crime: गोव्यात तीन जुगार अड्ड्यांवर कारवाई; सहा संशयितांना अटक

नाविन्यपूर्ण क्रीडानगरी

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की कांपालची क्रीडानगरी चार-पाच दिवसांत उभी राहील. ही एक नाविन्यपूर्ण क्रीडानगरी असेल. या क्रीडानगरीस लोकांनी मोठ्या प्रमाणात भेट द्यावी यासाठी आमचा प्रयत्न आहे.

क्रीडानगरीमुळे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कांपाल ते मिरामार परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस विभागाला योग्य नियोजन करण्यास सांगितले आहे.

पणजी परिसर गजबजणार

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक खेळ कांपाल येथे होतील. शिवाय मिरामार समुद्रकिनारी बीच स्पर्धा होतील.

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, तसेच बांबोळी येथील अॅथलेटिक्स स्टेडिमवरही स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे २२ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत पणजी शहर आणि परिसर गजबजलेला असेल.

CM PRamod Sawant
CM Pramod Sawant: कांपाल येथील स्विमिंग कॉम्प्लेक्सची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; नॅशनल गेम्सच्या तयारीची लगबग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com