Illegal House Demolition At Mapusa Goa
म्हापसा : खडपावाडा-कुचेली येथील सरकारने संपादित केलेल्या जागेत अतिक्रमण करून अनधिकृतरीत्या उभारलेल्या ३६ घरांवर सोमवारी राज्य प्रशासनाने बुलडोझर फिरवला. दुपारपर्यंत १२ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती.
सविस्तर माहितीनुसार, मंगळवारी (ता.११) सकाळी अतिक्रमण हटाव पथकाने दोन जेसीबीच्या साहाय्याने ही बेकायदा घरे पाडण्याचे काम पोलिस बंदोबस्तात हाती घेण्यात आले. मामलेदार अनंत मळीक यांच्या समवेत एनजीपीडीएचे अभियंता तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
तसेच उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक निखिल पालेकर, निरीक्षक सूरज गावस हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित होते. आठवड्यापूर्वीच प्रशासनाने संपादित जागेत बांधलेल्या बेकायदा घरांवर नोटिसा चिकविल्या होत्या. ज्यामध्ये संबंधितांना घरे खाली करण्याचे निर्देश होते.
घामा-कष्टाचे पैसे पाण्यात
पंडितांच्या दाव्यानुसार ज्यांनी आम्हाला या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली, त्यांनी आम्हाला ही जमीन पंचायतीची असल्याचे भासविले. सर्व कागदपत्रे कायदेशीर करून देतो, असे आश्वासन दिले. त्यामुळेच या ठिकाणी पदरमोड करून घामाकष्टाचे पैसे गुंतविले.
मात्र आमची लोकप्रतिनिधींसह त्यांच्या टीमने फसवणूक केल्याचा गंभीर आरोप संबंधित पीडित महिलांनी केला. आज-उद्या हा विषय सेटलमेंट होईल, या आशेने आम्ही सर्वजण गप्प बसलो होतो.
मात्र आता संयमाचा बांध फुटला असून आमची घरे डोळ्यादेखत जमीनदोस्त केली आहेत. आम्ही रस्त्यावर आलो आहोत, असेम्हणत पीडितांनी या जमीन ठगसेनांच्या नावाने यावेळी टाहो फोडला.
जागा विकणारे मोकाट : लाखो रुपये घेऊन या जागेत अतिक्रमण करून घरे बांधण्यास पीडित लोकांना प्रोत्साहन देणारे सध्या मोकाट आहेत.
लोकप्रतिनिधींनी के ले हात वर!
पीडितांनी सांगितले की, ज्या लोकांनी आम्हाला या जागा दिल्या, त्यांनी तस आश्वासन दिले होत. मात्र आता सर्वांनीच हात वर केले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी घरी गेल्यावर त्यांनी हाकलून दिले. फक्त वोट बँकपूर्ता आमचा वापर केल्याचा आरोप या पीडितांनी यावळी केला.
माझा या व्यवहाराशी संबंध नाही; जोशुआ डिसोझा
जोशुआ कुचली कोमुनिदाद जागत, सर्वधर्मीय स्मशानभूमी यणार आहे याची पूर्वकल्पना मी सर्वांना दिली होती. मात्र कुणीच याबाबत गांभीर्यान घेतले नाही. तसच येथे घरे बांधताना कुणीही माझ्याशी संपर्क साधला नाही.
संबंधितांनी स्वतःच्या जबाबदारीवर घरे बांधली. कुणी कितीही दावे केले तरी कुणाकड दस्तऐवज नाहीत. ही घरे मागील दोन वर्षात अवतरली आहेत, त्यामुळे आमच्या घरांना अमुक वर्षे झाली असे दावे केल्याने वस्तुस्थिती बदलत नाही.
या व्यवहारात माझा कुठलाच सहभाग नाही. उलट तिथ घरे बांधू नका असे मी संबंधितांना कळविले होत, अशी प्रतिक्रिया उपसभापती तथा म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.