Pernem Mobile Theft: पेडणे येथे एका कंपनीच्या गोदामातून तब्बल 4.81 लाखांचे मोबाईल फोन चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चोरी केलेले सर्वजण हे कंपनीतीलच कर्मचारी असून त्यांना पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माहितीनुसार, पेडणे येथे असलेली क्रीएटिव्हिटी अॅट बेस्ट टेक्नॉलॉजी या कंपनीच्या गोदामात फ्लिपकार्ट ई सेवेतर्फे ग्राहकांंनी मागवण्यात आलेले मोबाईल फोन्स होते.
त्यापैकी 21 वेगवेगळ्या कंपनीचे फोन तिथे काम करत असलेल्या 5 कर्मचाऱ्यांनी चोरी केले. चोरीची माहिती मिळताच कंपनीच्या मॅनेजरने पोलिसात तक्रार दाखल केली होती. याबाबत पेडणे पोलिसांनी विराज वेंगुर्लेकर (22, सावंतवाडी), श्रीधर राऊळ (22, सावंतवाडी), वैभव सातार्डेकर (24, शिरोडा), हर्षल गोवेकर (22, सावंतवाडी), गौरव चित्रसेन (22, सावंतवाडी) यांना अटक केली आहे.
दरम्यान, यामध्ये एकूण 4,81, 215 रुपये किमतीचे 21 मोबाईल्स चोरले असून त्यापैकी 3,10,000 रुपये किमतीचे 14 फोन तूर्तास जप्त करण्यात आले आहेत. उरलेले 7 फोन जप्त करणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.