
200 heritage sites in Goa to be preserved
पणजी: राज्यातील बहुचर्चित पुरातन वास्तूंचे जतन केले जाणार आहे. गोवा राज्य वारसा धोरण २०२५ चा मसुदा आज पुरातत्व आणि पुराभिलेखमंत्री सुभाष फळदेसाई यांना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी सादर केला.
यावेळी डॉ. नंदकुमार कामत, प्रा. राजेंद्र आर्लेकर, प्रसाद लोलयेकर, संचालक नीलेश फळदेसाई, बालाजी शेणवी आणि इतर उपस्थित होते. हे भारतातील पहिले राज्यस्तरीय वारसा धोरण आहे. १७२ पानी धोरण मसुद्यात १४ प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले आहे. २०० हून अधिक ऐतिहासिक, पुरातत्व आणि वारसा स्थाने नमूद करण्यात आली आहेत.
ऐतिहासिक आणि वारसा मूल्य असलेल्या १०० हून अधिक खासगी आणि सरकारी इमारतींची यादी तयार करण्यात आली आहे. ज्यात गोव्यातील ४६ वेगळे, अस्सल लोकस्वरूप लोककला प्रकार आणि ६१ पारंपरिक व्यवसायांबाबत माहिती देण्यात आली आहे.
वारसा धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. त्याला मान्यता घेऊन पुढील वाटचाल वेगाने होईल. वारसास्थळांचे जतन व संवर्धन करून त्याद्वारे महसूलही निर्माण करण्यात येईल. देशात अशा प्रकारे पहिल्यांदाच कोणते राज्य धोरण तयार करत असेल. त्याशिवाय लोककला, पारंपरिक व्यवसायांना बळ मिळेल.
सुभाष फळदेसाई, मंत्री, पुरातत्व खाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.