Sanquelim News: साखळी-देसाईनगरात 2 गव्यांचा 5 तास धुमाकूळ

नागरिकांच्या गोंधळाने गवेही बिथरले
Bison | File Photo
Bison | File PhotoDainik Gomantak

Sanquelim News: साखळी शहरात दोन गवे भर लोकवस्तीत शिरण्याचा प्रकार आज (शुक्रवारी) सकाळी घडला. साखळीतील देसाईनगर भागात हे गवे घुसले. गवे भरवस्तीत घुसल्याने लोकांमध्ये एकूच खळबळ आणि गोंधळ उडाला.

तर गवेही काहीसे बिथरले. अखेर प्राणीमित्र, वन खाते आणि स्थानिकांच्या अथक परिश्रमानंतर गव्यांना पिटाळून लावण्यात यश आले.

Bison | File Photo
Goa Disqualification Plea: आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवरून खंडपीठाने सभापतींना खडसावले...

सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन देसाईनगर-साखळी भागात शिरले. गवे लोकवस्तीत घुसल्याने त्या भागातील लोकांमध्ये गोंधळ तेवढीच घबराट पसरली. हे गवे कोठून आले, त्याची माहिती मिळू शकली नसली, खाद्याच्या शोधात हे गवे चुकून साखळी शहरात घुसले. असा अंदाज आहे.

गवे लोकवस्तीत घुसल्याची माहिती मिळताच ऍनिमल रेस्क्यू स्कॉडचे कार्यकर्ते नंतर वन खात्याचे पथक देसाईनगरात दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने गव्यांना पिटाळून लावण्याची मोहीम हाती घेतली. मात्र गव्यांनी सर्वांना जेरीस आणले. अखेर पाच तासांच्या प्रयत्नानंतर गव्यांनी रानाच्या दिशेने धूम ठोकली.

झाडांच्या कत्तलीचा परिणाम

सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत आहे. जंगले बोडकी होऊ लागली आहेत. त्यामुळे वन्यप्राणी भक्ष्य किंवा खाद्य शोधण्यासाठी लोकवस्तीत घुसत आहेत. जंगले वाचली नाहीत, तर भविष्यात भयानक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत प्राणीमित्र अमृत सिंग यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com