Panjim News: राजधानीच्या हिरव्या आच्छादनाला छेद! ९० झाडांच्या फांद्या कापणार

Dangerous Trees At Panjim: महानगरपालिकेने दोन पथके झाडांच्या फांद्या कापण्यासाठी आणि धोकादायक झाडे हटविण्यासाठी नेमली आहेत
Dangerous Trees At Panjim: महानगरपालिकेने दोन पथके झाडांच्या फांद्या कापण्यासाठी आणि धोकादायक झाडे हटविण्यासाठी नेमली आहेत
Dangerous Trees At PanjimDainik Gomantak
Published on
Updated on

राजधानीत तीन दिवसांपूर्वी गार्सिया उद्यानाजवळील झाड अंगावर पडल्याने युवतीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महानगरपालिका फारच गंभीर झाल्याचे दिसत आहे. महानगरपालिकेने दोन पथके झाडांच्या फांद्या कापण्यासाठी आणि धोकादायक झाडे हटविण्यासाठी नेमली आहेत.

सध्या प्राथमिक निरीक्षणानंतर महानगरपालिकेच्या यादीवर १४ झाडे धोकादायक, तर ९० झाडांच्या फांद्या हटवाव्या लागणार आहेत. त्यामुळे राजधानीतील हिरव्या आच्छादनाला (ग्रीन कव्हर) छेद जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

राज्यभर पावसाने ५० दिवसांत इंचाची शंभरी पार केली आहे. विक्रमी पावसाबरोबर जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे झाडे पडणे, भूस्खलन, घर कोसळण्याच्या घटना घडल्या. राजधानीतही पाणी साचण्याचे प्रकार घडले, त्याशिवाय आल्तिनो, मध्यपणजी परिसरात झाडे कोसळण्याचे प्रकार घडले.

Dangerous Trees At Panjim: महानगरपालिकेने दोन पथके झाडांच्या फांद्या कापण्यासाठी आणि धोकादायक झाडे हटविण्यासाठी नेमली आहेत
Tree Falls on Girl at Panaji: पणजीत झाड अंगावर कोसळल्याने तरुणी गंभीर

मध्य पणजीत गार्सिया उद्यानाजवळील पदपथावर असणारे गुलमोहराचे झाड पडल्याने त्याखाली सापडून युवतीचा मृत्यू झाला. त्यामुळे पणजी महानगरपालिकेची झोप उडाली. परंतु तत्पूर्वीच महानगरपालिकेने रस्त्याच्या बाजूच्या झाडांच्या फांद्या हटविण्याचे काम आल्तिनो परिसरात सुरू केले होते.

रविवारी ही घटना घडल्यानंतर महानगरपालिकेला धोकादायक झाडे आणि झाडांच्या धोकादायक फांद्या हटविण्याचे काम हाती घ्यावे लागले. महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले की, पणजी शहरात १४ झाडे धोकादायक असल्याचे केलेल्या पाहणीत आढळले.

मध्य पणजीत झाड पडून युवतीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आपण तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो. त्यानंतर त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीशी चर्चा करून त्या युवतीच्या कुटुंबाला मदत जाहीर केली. अशा घटना घडू नयेत, यासाठी महानगरपालिकेला दोना पावलापासून रायबंदरपर्यंत निरीक्षण करावे लागणार आहे. प्राथमिक निरीक्षणात जी धोकादायक झाडे दिसून आली आहेत, ती हटविली जात आहेत. सध्या महानगरपालिकेने दोन पथके नेमली आहेत आणि फांद्या कापण्यासाठी दोन क्रेनही कामाला लावल्या आहेत.

रोहित मोन्सेरात, महापौर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com