10th Result : सत्तरी तालुक्यातील 9 सरकारी विद्यालयांचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के

9 शाळांचा निकाल 100% : पालक व शिक्षक समाधानी; खासगी विद्यालयांची घसरण
10th Result
10th ResultGomantak Dgital Team

वाळपई : सत्तरी तालुक्यातील एकूण 14 सरकारी माध्यमिक विद्यालयांपैकी 9 विद्यालयांचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला. तर, खासगी 8 विद्यालयांपैकी केवळ 1 विद्यालय ही किमया साधू शकले. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही सत्तरीतील सरकारी माध्यमिक विद्यालयांनी चांगली कामगिरी बजावली. वाळपई नॅशनल स्कूलचा निकाल सर्वांत कमी म्हणजे 83.33 टक्के लागला.

सरकारी माध्यमिक विद्यालय सुर्ला, सरकारी माध्यमिक विद्यालय ठाणे, सरकारी माध्यमिक विद्यालय गुळेली, सरकारी माध्यमिक विद्यालय अडवई, सरकारी माध्यमिक विद्यालय दाबे, सरकारी माध्यमिक विद्यालय सावर्डे, सरकारी माध्यमिक विद्यालय शेळप,

वाळपई सरकारी माध्यमिक विद्यालय, सरकारी माध्यमिक विद्यालय पिसुर्ले व केरी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे. केरी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयानेही चांगली कामगिरी साधली. ज्ञानेश्वर पार्सेकर या विद्यार्थ्याने 92 टक्के गुण मिळवून केरी-सत्तरीत पहिला येण्याचा मान मिळविला.

10th Result
Valpoi Water Shortage : म्हाऊस गावात पाणीटंचाई ; उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागतेय वणवण, महिलांचा संताप

सरकारी माध्यमिक विद्यालय नगरगाव 93.33 टक्के, माध्यमिक विद्यालय भुईपाल 94.92 टक्के, अवर लेडी ऑफ लुडस हायस्कूल वाळपईचा निकाल 95.21 टक्के लागला. 146 पैकी 139 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात प्रथम स्वरांगी मराठे (96.16) विद्यालयात प्रथम आली तर तन्‍वी गावस (95.16) द्वितीय आली. केरी सरकारी माध्यमिक विद्यालयाचा निकाल 96.15 टक्के लागला.

वाळपई युनिटी हायस्कूल 96.42 टक्के तर अडवई शाळेचा निकाल चौथ्यांदा 100 टक्के लागला आहे. सरपंच उदयसिंग राणे व इतरांनी यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. पिसुर्ले विद्यालयाचा निकालही 100 टक्के लागला. सरपंच देवानंद परब यांनी विद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्‍या परिश्रमामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले.

10th Result
Valpoi News: 'उद्योग योजनेतून आत्मनिर्भरतेकडे...' वाणिज्य खात्याची वाळपईत कार्यशाळा

माध्यमिक विद्यालय मोर्लेचा निकाल 94.12 टक्के तर श्री हनुमान विद्यालयाचा निकाल 95 टक्के लागला. श्रीराम हायस्कूल खडकीचा निकाल 97.92 टक्के लागला. या विद्यालयातून विघ्नेश नरेश गावकर प्रथम, अनिश्वी गजानन गावकर द्वितीय तर समीक्षा संतोष देसाई तृतीय आली.

ठाणे विद्यालयाचे आमदारांकडून अभिनंदन

ठाणे येथील कै. हिरोजीराव बाबुराव देसाई सरकारी माध्‍यमिक विद्यालयाचा निकाल सलग चौथ्या वर्षी 100 टक्के लागल्याबद्दल ठाणे डोंगुर्ली पंचायत मंडळ, पालक-शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समितीतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

तसेच पर्येच्‍या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी ठाणे सरकारी माध्यमिक विद्यालयाची ‘मॉडेल स्कूल’ म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. रजत गावस, श्रुती गावस, कृष्णा गावकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com