संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 2014 ते 2023 या दहा वर्षात राज्यात महिन्याला सरासरी 8 महिलांचा मृत्यू स्तनाच्या कर्करोगामुळे झाल्याचे मंत्रीमहोदयांनी लेखी उत्तराद्वारे सांगितले. शफी परांबील यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद राष्ट्रीय कर्करोग नोंदणी प्रकल्प राबवतेय. यानुसार, देशभरात 2014 ते 2023 या काळात कर्करोगामुळे मृत्यू झालेल्या मृत्यूसंबंधी आकडेवारी काढण्यात आली. या आकडेवारीनुसार, गोव्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या दहा वर्षात गोव्यात 1002 महिलांचा केवळ स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे, 2023 या वर्षात सर्वाधिक 110 मृत्यू झाले. तर 2022 मध्ये 109, 2021 मध्ये 106 तर 2020 मध्ये 103 महिलांचा मृत्यू झाला.
तसेच, गोव्यात 2014 ते 2023 या दहा वर्षात 441 महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. तर सर्वाधिक 2023 मध्ये सर्वाधिक 48 महिलांचा मृत्यू झाला. 2021 आणि 2022 मध्ये प्रत्येकी 47 2020 मध्ये 54, 2019 मध्ये 44, 2018 आणि 2017 मध्ये 43, 2016 मध्ये 42, 2015 मध्ये 41, 2014 मध्ये 40 महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.