ENG vs IND: प्रिन्सला सुवर्णसंधी! शुभमन गिलचा इंग्लंडमध्ये दिसणार जलवा; नव्या कॅप्टनच्या निशाण्यावर किंग कोहलीचा महारेकॉर्ड

Shubman Gill Captaincy: जर गिलने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतासाठी 2 सामने जिंकले तर तो कर्णधार म्हणून अजित वाडेकर, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि राहुल द्रविड यांना मागे सोडेल.
Shubman Gill
Shubman Gill Dainik Gomantak
Published on
Updated on

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी आतुर आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर गिलच्या सेनेसाठी ही एक मोठी परीक्षा मानली जात आहे. कारण टीम इंडियात तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका खेळणे हे गिलसाठी मोठे आव्हान आहे. कारण तो पहिल्यांदाच कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. यादरम्यान गिलला किंग कोहलीचा महारेकॉर्ड मोडण्याची संधी देखील असेल.

गिलला इतिहास रचण्याची संधी!

जर गिलने इंग्लंडविरुद्धच्या (England) 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतासाठी 2 सामने जिंकले तर तो कर्णधार म्हणून अजित वाडेकर, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि राहुल द्रविड यांना मागे सोडेल. याशिवाय, जर त्याने त्याच्या नेतृत्वाखाली भारतासाठी 3 कसोटी सामने जिंकले तर तो कपिल देव यांना मागे टाकेल आणि त्याच्या पहिल्याच कसोटी मालिकेत विराट कोहलीची बरोबरी करेल. तसेच, जर शुभमन गिलने 4 कसोटी सामने जिंकले तर तो कर्णधारपदाच्या बाबतीत विराट कोहलीलाही मागे सोडेल.

Shubman Gill
IND VS ENG: कसोटीत धावांची बरसात करणारे टॉप-5 भारतीय कर्णधार, इंग्लंडविरुद्ध ठरलेत सुपरहिट, पहिल्या क्रमांकावर कोण?

सर्वाधिक सामने जिंकले

दरम्यान, कर्णधार म्हणून विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत. त्याने 3 सामने जिंकले आहेत. याशिवाय, कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने 2 कसोटी सामने जिंकले आहेत. तसेच, राहुल द्रविड, एमएस धोनी, सौरव गांगुली आणि अजित वाडेकर यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली 1-1 कसोटी सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत शुभमन गिलकडे या दिग्गजांना मागे सोडण्याची सुवर्णसंधी आहे.

Shubman Gill
IND vs ENG Test Live Streaming: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा कधी, कुठे आणि कसा घेता येणार आनंद? जाणून घ्या

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत (India) आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत 136 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 35 सामने जिंकले असून इंग्लंडने 51 सामने जिंकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com