Pearl Fernandes: भूतानमध्ये गोमंतकीय 'पर्ल'चा डंका! सॅफ करंडकमध्ये भारताने नमवले बांगलादेशला

SAFF Women’s Championship: भूतानमधील थिम्पू येथे सुरू असलेल्या सॅफ करंडक १७ वर्षांखालील महिला फुटबॉल स्पर्धेत भारताने सलग दुसरा विजय नोंदविताना बांगलादेशला २-० फरकाने नमविले.
Pearl Fernandes goal
Pearl Fernandes Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भूतानमधील थिम्पू येथे सुरू असलेल्या सॅफ करंडक १७ वर्षांखालील महिला फुटबॉल स्पर्धेत भारताने सलग दुसरा विजय नोंदविताना बांगलादेशला २-० फरकाने नमविले, त्यात गोमंतकीय फुटबॉलपटू पर्ल फर्नांडिस हिने गोल केला.

पर्ल हिने डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर भारताला १४व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. नंतर बोनिफी लिया शुल्लाई हिने ७६व्या मिनिटास भारतीय महिला संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला.

Pearl Fernandes goal
Goa Sports: गोवा क्रीडा प्राधिकरणचे प्रशिक्षक ‘रडार’वर! काही केंद्रांवर शून्य प्रशिक्षणार्थी; अचानक तपासणीत खुलासा

अगोदरच्या लढतीत भारतीय महिला संघाने नेपाळचा ७-० फरकाने धुव्वा उडविला होता. त्या लढतीत पर्ल ७५व्या मिनिटास बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरली होती. शुक्रवारच्या लढतीत प्रशिक्षक ज्योकिम अलेक्झांडरसन यांनी पर्ल हिला स्टार्टिंग लाईन-अपमध्ये स्थान दिले आणि गोव्याच्या प्रतिभाशाली मुलीने संधीचे सोने करणारा गोलही केला.

Pearl Fernandes goal
Beach Sports Tourism Hub: आता ऑस्ट्रेलिया, ब्राझीलला जायला नको, गोवाच बनणार 'बीच स्पोर्ट्स टुरिझम हब'! सरकारची नवी योजना

हरमल येथील पर्ल हिने राष्ट्रीय महिला स्पर्धांतील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय संघ निवड समितीचे लक्ष वेधले. गतवर्षी ती नेपाळमध्ये झालेल्या सॅफ करंडक १६ वर्षांखालील महिला फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघातून खेळली होती, तेव्हा तिने आंतरराष्ट्रीय पदार्पणात भूतानविरुद्ध दोन गोल केले होते. राष्ट्रीय पातळीवर तिने गोव्याचे प्रतिनिधित्व केले असून राज्य पातळीवर ती सेझा फुटबॉल अकादमी संघातून खेळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com