WTC Final 2025: कमिन्सचा चमत्कार! जस्सीला मागे सोडत बनला नंबर 1 गोलंदाज

Pat Cummins top wicket-taker WTC: 2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमधील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह हा धक्का बसला. त्याची आता दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली.
pat cummins
Pat CumminsDainik Gomantak
Published on
Updated on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब होती. त्यामुळेच टीम इंडियाला फायनलमध्ये आपले स्थान पक्के करता आले नाही. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सीरिज जिंकावी लागणार होती. मात्र, टीम इंडियाला ही टेस्ट सीरिज जिंकता आली नाही. टीम इंडियासोबतच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही मोठा धक्का बसला. 2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमधील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराहला हा धक्का बसला. त्याची आता दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. या यादीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळणारा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स अव्वल स्थानी पोहोचला.

पॅट कमिन्स अव्वल स्थानी

कमिन्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) अंतिम सामन्यात पहिल्या डावात 6 बळी घेतले. अशाप्रकारे, तो आतापर्यंत 18 सामन्यांमध्ये 79 बळी घेत अव्वल स्थानी पोहोचला. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 15 सामन्यांमध्ये 77 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने 32 बळी घेतले होते. त्याने 13.06 च्या सरासरीने ही चमत्कारीक कामगिरी केली होती. त्यावेळी त्याने मालिकावीराचा पुरस्कारही जिंकला होता.

pat cummins
WTC Final 2025: ऑस्ट्रेलियन जोडीची कमाल, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडनं बनवला विश्वविक्रम रचला, पहिल्यांदाच घडलं असं काही

दरम्यान, 2025च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क तिसऱ्या स्थानी आहे, ज्याने 19 सामन्यांमध्ये 75 बळी घेतले. तर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नाथन लायन चौथ्या स्थानी आहे. लायनने 17 सामन्यांमध्ये 66 बळी घेतले. कमिन्ससह तीनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बळींची संख्या वाढू शकते कारण सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये संघ दुसऱ्या डावातही गोलंदाजी करेल. भारताचा (India) रविचंद्रन अश्विन या यादीत पाचव्या स्थानी आहे, ज्याने 14 सामन्यांमध्ये 63 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com