National Modern Pentathlon: एमपीएफआय स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंना रौप्यपदक!

MPFI Triathle: गोव्याच्या बाबू गावकर व हरिश्चंद्र वेळीप यांनी राष्ट्रीय मॉडर्न पेंटॅथलॉन १३व्या एमपीएफआय ट्रायथल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले
MPFI Triathle: गोव्याच्या बाबू गावकर व हरिश्चंद्र वेळीप यांनी राष्ट्रीय मॉडर्न पेंटॅथलॉन १३व्या एमपीएफआय ट्रायथल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले
Babu Gaonkar, Harichandra VelipDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या बाबू गावकर व हरिश्चंद्र वेळीप यांनी राष्ट्रीय मॉडर्न पेंटॅथलॉन १३व्या एमपीएफआय ट्रायथल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. स्पर्धा उत्तराखंड येथील काशीपूर येथे सुरू आहे.

ट्रायथल प्रकारात बाबू गावकरने १९.२० मिनिट वेळेसह दुसरा क्रमांक पटकावला. ट्रायथल प्रकारात धावणे, जलतरण व नेमबाजी या क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. बाबूने गतवर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत लेझर रन प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. शिवाय राष्ट्रीय स्पर्धेत, तसेच नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्याने पदक जिंकले आहे.

MPFI Triathle: गोव्याच्या बाबू गावकर व हरिश्चंद्र वेळीप यांनी राष्ट्रीय मॉडर्न पेंटॅथलॉन १३व्या एमपीएफआय ट्रायथल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले
All Goa Chess Tournament: इव्हान, सिदोनिया यांना अपराजित कामगिरीसह बुद्धिबळात विजेतेपद

हरिश्चंद्र वेळीपने बायथल प्रकार स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. त्याने १४.२० मिनिटांच्या वेळेसह हे पदक जिंकले. तो करमणे - दाबाळ - धारबांदोडा येथील असून पहिल्यांदाच बायथल स्पर्धेत सहभागी झाला होता. राष्ट्रीय स्पर्धेला १४ रोजी सुरवात झाली असून १८ ऑगस्टपर्यंत चालेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com