Football Tournament: फोंडा तालुका फुटबॉल स्पर्धेत दिनेश जल्मी यांचा संघ विजय़ी; केपे संघावर शुटआउटवर मिळवला विजय

Gomantak Gaud Samaj Football Tournament: बागवाडा- खांडेपार येथे ही स्पर्धा झाली; स्पर्धेचे उद्‌घाटन पद्‌मश्री ब्रम्हानंद शंखवाळकर यांचे हस्ते झाले
Gomantak Gaud Samaj Football Tournament: बागवाडा- खांडेपार येथे ही स्पर्धा झाली; स्पर्धेचे उद्‌घाटन पद्‌मश्री ब्रम्हानंद शंखवाळकर यांचे हस्ते झाले
Gomantak Ponda Football TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गोमंतक गौड मराठा समाज या संस्थेने आयोजित केलेल्या दुसऱ्या फोंडा तालुका फुटबॉल स्पर्धेत दिनेश जल्मी यांच्या संघाने विजेतेपद पटकाविले. सोयरू वेळीप यांचा केपे तालुका संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात फोंडा संघाने केपे संघावर पॅनल्टी शुटआउटवर विजय मिळवला.

उत्कृष्ट आघाडीपटू म्हणून केपे संघाचा राहूल गावकर, उत्कृष्ट गोलरक्षक- भास्कर जल्मी, बचावपटू म्हणून अशिश बोरकर (फोंडा) आणि स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून भास्कर जल्मी यांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेत आठ संघानी भाग घेतला. त्यात तिसवाडी (मालक- पुंडलिक गांवस), काणकोण (मालक- उदय गांवकर), अंत्रूज (मालक - अमृत गावडे), फोंडा (मालक- दिनेश जल्मी), केपे (मालक - सोयरू वेळीप), धारबांदोडा (मालक - रमाकांत गांवकर), सांगे (मालक - शान गांवकर) आणि डिचोली (मालक - रोहीदास कांसेकर) या संघांचा समावेश होता.

Gomantak Gaud Samaj Football Tournament: बागवाडा- खांडेपार येथे ही स्पर्धा झाली; स्पर्धेचे उद्‌घाटन पद्‌मश्री ब्रम्हानंद शंखवाळकर यांचे हस्ते झाले
Football Tournament: गोमंतक गौड मराठा समाजातर्फे 'फुटबॉल स्पर्धा'; एकूण आठ संघांचा सहभाग

दरम्यान, बागवाडा- खांडेपार येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्‌घाटन पद्‌मश्री ब्रम्हानंद शंखवाळकर यांचे हस्ते झाले. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गावडे, फोंडाचे मामलेदार भिकू गांवस, संस्थेचे अध्यक्ष मधू गांवकर, कार्यकारी अध्यक्ष आणि माजी आमदार प्रसाद गावकर व इतर उपस्थित होते.

स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात अजय गावडे, नेहरू युवा केंद्राचे उप संचालक कालिदास घाटवळ, पोलिस निरीक्षक अर्जुन सांगोडकर, कार्यकारी अध्यक्ष प्रसाद गावकर, सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर व इतर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com