Kalaripayattu: राष्ट्रीय कलारीपयट्टू स्पर्धेसाठी राज्याचा संघ रवाना; १४ खेळाडूंचा सहभाग

Goa Kalaripayattu Team: कलारीपयट्टू हा पारंपरिक भारतीय मार्शल आर्ट खेळ असून त्याचा उगम केरळमध्ये झाला
Goa Kalaripayattu Team: कलारीपयट्टू हा पारंपरिक भारतीय मार्शल आर्ट खेळ असून त्याचा उगम केरळमध्ये झाला
Goa Kalaripayattu Team Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा, ता. १२ (प्रतिनिधी)ः भारतीय कलारीपयट्टू महासंघातर्फे केरळमधील करियात्तम-तिरुअनंतपुरम येथे १६वी राष्ट्रीय कलारीपयट्टू स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेतील ‘चुवाड’ व ‘हायकिक’ प्रकारात भाग घेण्यासाठी गोव्याचा १४ सदस्यीय संघ रवाना झाला.

सीनियर गटात भुवनेश्वर जाधव, मिहीर जाधव, श्वेता बसबिरे, फरान भरभुलिया, ज्युनियर गटात अरबाज टक्कलकी, शौरीश केरकर, विहान वळवईकर, श्रेया नाईक, अमेय सावंत, सौप्रयोगम्य पिळगावकर, विनिष्का प्रियोळकर, विप्रा मणेरीकर, सान्वी सावंत यांचा समावेश आहे.

Goa Kalaripayattu Team: कलारीपयट्टू हा पारंपरिक भारतीय मार्शल आर्ट खेळ असून त्याचा उगम केरळमध्ये झाला
Goa Sports: राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत श्रव्या फडतेने तब्बल आठ पदकांसहित मिळवली चॅम्पियनशिप

तन्वेष वेंगुर्लेकर संघाचे व्यवस्थापक असून दीपक आमोणकर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे. कलारीपयट्टू हा पारंपरिक भारतीय मार्शल आर्ट खेळ असून त्याचा उगम केरळमध्ये झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com