पणजी: कर्णधार अभिनव कन्नन याने शानदार शतक ठोकताना तमिळनाडूला भक्कम सुरवात करून दिली, त्यामुळे १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेच्या क गट सामन्यात ते गोव्याविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्याचे संकेत होते, मात्र सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर बुधवारी पाहुण्या संघाने दिवसाच्या अखेरच्या सत्रात प्रतिस्पर्ध्यांनी बिनबाद १३२ वरून ७ बाद २८७ अशी स्थिती केली.
चार दिवसीय सामन्याला बुधवारी तमिळनाडूतील थेनी येथे सुरवात झाली. अभिनवने २१२ चेंडूंत १८ चौकार व एका षटकारासह १३५ धावा केल्या. त्याने एस. श्रेणिक (६१) याच्यासमवेत संघाला १३२ धावांची सलामी दिली.
नंतर दुसऱ्या विकेटसाठी अभिनवने अक्षय सारंगधर याच्यासह ७६ धावांची भागीदारी केली. मात्र नंतर तमिळनाडूने ७७ धावांत सहा विकेट गमावल्यामुळे गोव्याला दिवसअखेर दिलासा मिळाला.
तमिळनाडू, पहिला डाव ः ९० षटकांत ७ बाद २८७ (एस. श्रेणिक ६१, अभिनव कन्नन १३५, अक्षय सारंगधर ३७, किरण कार्तिकेयन ११, आर. के. जयंत २७, पुंडलिक नाईक १२-०-३८-०, समर्थ राणे १२-२-४५-२, शमिक कामत १३-४-३३-१, अनुज यादव ३०-५-७९-२, यश कसवणकर १९-३-७३-१, शिवेन बोरकर ४-०-१९-१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.