पणजी: कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील एलिट ब गट सामन्यात सौराष्ट्राने दुसऱ्या दिवसअखेर शनिवारी गोव्यावर 14 धावांची आघाडी घेतली असून त्यांच्या अजून सात विकेट बाकी आहेत.
दरम्यान, सामना राजकोट येथे सुरु आहे. गोव्याचा पहिला डाव शनिवारी सकाळीच धावसंख्येत एका धावेची भर टाकून 274 धावांत संपुष्टात आल्यानंतर सौराष्ट्राने खेळ थांबला तेव्हा पहिल्या डावात 3 बाद 288 धावा केल्या होत्या. त्यांच्या रक्षित मेहता (65),कर्णधार हेत्विक कोटक (नाबाद 87) व अंश गोसाई (नाबाद 70) यांनी अर्धशतके झळकावली.
गोवा, पहिला डाव (9 बाद 273 वरून): 91.1 षटकांत सर्वबाद 274 (सनिकेत पालकर 49, शिवम प्रताप सिंग नाबाद 1, आदित्यसिंह जडेजा 5-68, सम्मर गज्जर 3-88). सौराष्ट्र, पहिला डाव: 86 षटकांत 3 बाद 288 (प्रशाम राजदेव 43, रक्षित मेहता 65, हेत्विक कोटक नाबाद 87, अंश गोसाई नाबाद 70, लखमेश पावणे 11-3-42-1, शिवम प्रताप सिंग 14-7-23-1, शदाब खान 23-2-72-0, दीप कसवणकर 24-1-95-0, अझान थोटा 2-0-4-0, आर्यन नार्वेकर 7-2-14-0, सनिकेत पालकर 5-2-27-0).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.