C K Nayudu Trophy: शिवेंद्रचा शतकी धडाका! नागालँडचे चिवट प्रत्युत्तर, सामना रंगतदार अवस्थेत

C K Nayudu Trophy 2024: शिवेंद्र भुजबळचे सलग दुसरे शतक, तसेच त्याने लखमेश पावणे याच्यासमवेत केलेली शतकी भागीदारी यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याने ४५९ धावा केल्या, मात्र नंतर त्यांना नागालँडच्या फलंदाजांनी सतावताना दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ११८ धावा केल्या.

Shivendra BhujbalDainik Gomantak
Published on
Updated on

C K Nayudu Trophy 2024 Goa Vs Nagaland Cricket Match

पणजी: शिवेंद्र भुजबळचे सलग दुसरे शतक, तसेच त्याने लखमेश पावणे याच्यासमवेत केलेली शतकी भागीदारी यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याने ४५९ धावा केल्या, मात्र नंतर त्यांना नागालँडच्या फलंदाजांनी सतावताना दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ११८ धावा केल्या.

नागालँडमधील सोविमा येथे ब गट चार दिवसीय सामना सुरू आहे. सोमवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्याने ६ बाद ३०१ वरून पुढे खेळण्यास सुरवात केली. छत्तीसगडविरुद्ध मागील लढतीतही शतक केलेल्या शिवेंद्रने तोच फॉर्म कायम राखताना सोमवारी १६४ धावांची दमदार खेळी केली. त्याने २१३ चेंडूंचा सामना करताना १७ चौकार व पाच चौकार मारले. शिवेंद्रने सातव्या विकेटसाठी लखमेश पावणे याच्यासमवेत १२६ धावांची भागीदारी केली. सलग दुसऱ्या डावात अर्धशतक केलेल्या लखमेश याने ८८ चेंडूंत नऊ चौकारांसह ६८ धावा केल्या. नंतर शिवेंद्रने शिवम प्रताप सिंग याच्यासमवेत नवव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करून गोव्याला साडेचारशे धावांचा टप्पा गाठून दिला.

नागालँडच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी करून गोव्याच्या गोलंदाजांना सहजासहजी यश मिळू दिले नाही. दिवसअखेर २१ धावांवर नाबाद असलेल्या सलामीच्या केनेईझेतुओ रियो याने तब्बल १४९ चेंडूंचा सामना केला, तर आक्रमक फलंदाजी केलेल्या मुघावी सुमी याने ६२ चेंडूंत आठ चौकारांसह ५६ धावा केल्या. नागालँडचा संघ अजून ३४१ धावांनी मागे आहे.

C K Nayudu Trophy 2024: शिवेंद्र भुजबळचे सलग दुसरे शतक, तसेच त्याने लखमेश पावणे याच्यासमवेत केलेली शतकी भागीदारी यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याने ४५९ धावा केल्या, मात्र नंतर त्यांना नागालँडच्या फलंदाजांनी सतावताना दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ११८ धावा केल्या.
C K Nayudu Trophy: शिवेंद्र - लखमेशची शतकी भागीदारी! तरीही गोवा मोठ्या धावसंख्येपासून वंचित

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (६ बाद ३०१ वरून) ः १२२ षटकांत सर्वबाद ४५९ (शिवेंद्र भुजबळ १६४, लखमेश पावणे ६८, शदाब खान ०, शिवम प्रताप सिंग नाबाद १४, अभिनंदन ठाकूर २, अनिल गुप्ता ३-८०, अर्जुन २-६४, नेईझेखो ३-१०३).

नागालँड, पहिला डाव ः ५१ षटकांत २ बाद ११८ (केनेईझेतुओ रियो नाबाद २१, विशाल साहानी २१, मुघावी सुमी ५६, युगंधर नाबाद ११, शदाब खान २०-११-३९-१, लखमेश पावणे ११-५-२२-०, शिवम प्रताप सिंग ६-१-२६-०, अभिनंदन ठाकूर ७-१-१०-०, अझान थोटा ६-२-१२-१, कौशल हट्टंगडी १-०-१-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com