Social Media Trolling: ट्रोलिंगचे वादळ झेलण्याचे काही कानमंत्र

social media harassment: गंमत म्हणून सुरू झालेल्या ट्रोलिंगने आज भयानक रूप धारण केले आहे. एके काळच्या हलक्याफुलक्या मजा-मस्करीचे आता संघटित व्यापारीकरण झाले आहे.
Social Media Trolling
Social Media TrollingDainik Gomantak
Published on
Updated on

गंमत म्हणून सुरू झालेल्या ट्रोलिंगने आज भयानक रूप धारण केले आहे. एके काळच्या हलक्याफुलक्या मजा-मस्करीचे आता संघटित व्यापारीकरण झाले आहे. कधी आपल्याला यात गुंतवले जाते व आपण कधी व्यसनाधीन झालो हे आपल्या लक्षात येत नाही. ट्रोलिंग मुख्यत: तीन प्रकारचे असते- कॉर्पोरेट ट्रोलिंग, राजकीय ट्रोलिंग व पर्सनल म्हणजे वैयक्तिक स्वरूपाचे ट्रोलिंग. ट्रोलिंग या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ ‘मासेमारी’ असाही होतो. तसे पाहिल्यास सोशल मीडियावर वेगळे काय असते. गळ लावून जाळे फेकायचे, मासा अडकला तर अडकला. (शिवाय इंटरनेट’ या शब्दातील ‘नेट’चा अर्थ जाळे असाच होतो.)

प्रत्यक्षात ट्रोलिंग’ शब्दाचा उगम लोकांना त्रासदायक ठरलेल्या, युरोपातील स्केडीनेव्हीया येथल्या पुराणकाळातील ‘ट्रोल’ नावाच्या अक्राळविक्राळ प्राण्यापासून झाला आहे. या प्राण्यामुळे लोकांचे जगणे व प्रवास करणे कठीण झाले होते, अशी ती दंतकथा आहे. सोशल मीडिया प्लेट्फॉर्मचा आधार घेऊन, वैयक्तिकरीत्या अथवा संघटितपणे एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तीसमूहाला डिवचणे, भडकवणे, सुरळीत चाललेल्या विषयाला वेगळे वळण देणे, अशी काही ट्रोलिंगची ढोबळ व्याख्या. ट्रोल करताना लिखाण, ऑडिओ आणि व्हिडिओ यांचा वापर केला जातो.

या ट्रोलिंगमधून कुणीही सुटत नाही. सर्वसाधारण व्यक्ती असो वा सेलेब्रेटी, पत्रकार असो वा राजकारणी, व्यावसायिक असो वा चाकरमानी, पक्ष, धर्म, पंथ, जात, संघटना कुणालाही यातून सुटका नाही. या ट्रोलिंगच्या वादळात भल्या भल्यांचा पालापाचोळा होताना आम्ही पाहतो. या वादळात सापडलोच तर आपल्या हाती करायचे असे काय राहते, याविषयी थोडे स्वानुभव कथन.

Social Media Trolling
Goa Politics: मुख्‍यमंत्री, लोबोंसमोर शहांनीच मांडली गोव्‍याची 'राजकीय कुंडली'; कोण बरे बोलतो? कोण जळतो? रिपोर्ट आधीच तयार

असे नाही की सोशल मीडिया आले व हे ट्रोलिंग सुरू झाले. तसे पाहिल्यास ‘माध्यमा’च्या उगमापासून ट्रोलिंगचा प्रकार थोड्याफार प्रमाणात अस्तित्वात आला आहे. माध्यमाची सुरुवात छापील वृत्तपत्रापासून होऊन रेडिओ, टीव्ही असा प्रवास करीत आज ते सोशल मीडियापर्यंत येऊन पोहोचले आहे. दोन किंवा जास्त वृत्तपत्रे, एखाद्या विषयावर परस्पर विरोधी भूमिका घेतात व आपली भूमिका सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या बाजूच्याची उणीदुणी प्रसिद्ध करतात त्याला आपण ट्रोलिंगचे आद्यस्वरूप म्हणू शकतो. पण या ट्रोलिंगला मर्यादा आहेत. पुराव्याशिवाय काही प्रसिद्ध केल्यास, त्यामुळे त्रस्त व्यक्तींना संबंधितांवर कायदेशीर कारवाई करता येते. शिवाय, आपलीही बाजू तयार करून प्रसिद्ध कार्याला वेळ मिळतो.

रेडिओ या माध्यमाचा ट्रोलिंगसाठी जास्त दुरुपयोग झालेला नाही. खाजगी टीव्ही वाहिन्या आल्यानंतर दिवसभराच्या घडामोडीवर आधारित रात्री ‘राष्ट्रीय चर्चा’ सुरू झाल्या व तेथूनच आताच्या सोशल मीडियावरील ट्रोलिंगचे स्वरूप तयार झाले. आज प्रत्येकजण आपल्या मोबाइलवरून एक राष्ट्रीय नव्हे आंतरराष्ट्रीय ‘सोशल मीडिया चॅनल’ चालवत आहे, त्यामुळे घटनेच्या काही क्षणातच ‘चक्रीवादळ’ तयार होते. या चक्रावलेल्या अवस्थेत आपल्याकडून चुका होऊ शकतात व त्या होऊ नयेत म्हणून आपल्याला काय करता येते, यावर चर्चा करू या.

माझी एक सवय आहे, की एखादा ओळखीचा अधिकारी अडचणीत असेल तर मी त्याला मुद्दाम फोन करतो व काही मदत लागल्यास कळव, असे सांगतो. हल्लीच्या गोमेकॉ प्रकरणात निलंबनाचे आदेश दिलेल्या त्या सहकारी डॉटरला मी अशाच तर्‍हेचा फोन केला. संध्याकाळपर्यंत फार तर तीनचार वेळा माझे त्या डॉटरशी बोलणे झाले असेल, पण त्याला हव्या असलेल्या विषयावरच. त्याला दिलेला पहिला कानमंत्र हाच होता की, ‘तू स्वत: जास्त लोकांशी बोलू नको. सर्वांत आधी स्वत:च्या कुटुंबीयांना विश्वासात घे व त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य निर्णय घे’.

आता मागाहून खूप गोष्टी बोलता येतात; पण त्या वेळी ‘डोयावर ताटकळत असलेल्या निलंबनाच्या तलवारीचा सामना कसा करायचा?’, यावरच आमचे लक्ष केंद्रित झाले होते. समजा त्या दिवशी सुट्टी नसली तर, त्या रात्रीच निलंबनाचा आदेश घरी पोहोचला असता. दुसरा त्याला कानमंत्र दिला होता की पुढील काही दिवस वर्तमानपत्रात व सोशल मीडियावर, चांगले वाईट काही तरी येत राहील त्यावर लक्षच देऊ नको. असे नाही की त्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपल्या विश्वासू मित्रावर द्यायची व त्यातून मिळणाऱ्या महत्त्वाच्या संकेतांवर लक्ष देऊन आणली वेळोवेळची रणनीती बनवायची. जी काही स्पष्टीकरणे द्यायची योग्य चौकशी अधिकाऱ्यासमोरच द्यायची.

Social Media Trolling
Goa Politics: बाबू आजगावकरांचा मुलगाच डिस्कोत विकतो गांजा! आमदार आर्लेकरांचे प्रतिउत्तर, म्हणाले, मी पुन्हा येईन...

आपल्याविरुद्ध टपून बसलेले आपली भडास काढतील, त्याकडे यावेळी दुर्लश करायचे. त्यांच्यावरही अशीच वेळ येईल पण त्यावेळी त्यांनी केलेली चूक आपण करायची नाही. दुसऱ्याला वाईट सिद्ध करून आपण कधी बरोबर होऊ शकत नाही. समोरच्याला आपले निरपराधित्व सिद्ध करायची गरज नाही. आपण आपल्याशी प्रामाणिक असणे गरजेचे. ते डॉटर आता कुठे जे त्यावेळची वर्तमानपत्रे व सोशल मीडियावरील पोष्ट वाचत होते? आपल्यासाठी आपल्या सरांना ट्रोलिंग सहन करावे लागले, हे त्यांच्या आता लक्षात येत आहे.

माझ्यासाठी ट्रोल होणे नवीन नाही. वीस वर्षांपूर्वी जेव्हा मी सक्तीने हेल्मेट घालावे व सीटबेल्ट लावावा, याचे प्रबोधन मोटारसायक पायलटांमध्ये करत होतो, तेव्हा ’हेल्मेट व सीटबेल्टचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना विकले गेले असल्याची अफवा’ काही जणांनी पसरवली होती. त्याविषयी माझे नाव घेऊन अग्रलेखही लिहिले होते. पुढे सत्य कळल्यावर पिवळ्या मोटर सायकल पायलट संघटनेने माझा सत्कार केला.

मी ग्रामपंचायतीत लॉकडाउन करण्यापेक्षा कोविडसाठी तात्पुरती विलगीकरण कक्ष सुरू करावा अशी सूचना दिली व ती सूचना सर्वांनी उचलून धरली, तरी स्थानिक पातळीवर काही अफवा पसरून मला ट्रोल केले गेले. तीच गत मी पुढाकार घेतलेल्या कोविड मृतांच्या अंत्यविधींची झाली. प्रत्येक वेळेला झालेला ट्रोलमधून समोर आलेले संकेत मी आत्मपरीक्षणासाठी वापरतो, पण विषय अर्ध्यावर सोडून देत नाही.

जेव्हा ट्रोलचे थैमान चालू असते, त्यावेळी सर्व माध्यमांपासून दूर राहून सर्वांत जास्त झोप मी त्यावेळी घेतो. याचे कारण म्हणजे, काही वेळा इतरांवरचा राग कुणाला तरी ट्रोल करून काढला जातो, तर काही वेळा कुशाग्र मेंदूतील ज्ञान इतरत्र बाहेर काढता येत नाही, म्हणून ट्रोलिंगचा आधार घेतला जातो. आपण लक्षात घेतले पाहिजे की, सोशल मीडिया चांगल्या व वाईट स्वभावाच्या माणसांनी मिळून बनले आहे. इथे ट्रोलिंग होतच राहणार. त्याचा किती त्रास करून घ्यायचा ते शेवटी आपल्याच हाती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com