
नीना नाईक
लोकप्रतिनिधीच्या ठिकाणी ‘सेवाभाव’ असणे ही प्राथमिक गरज आहे. सेवाभाव घेऊन सक्रिय कार्यकर्ते अनेक असतात. त्यात जो निवडून येतो तो पंच, सरपंच, झेडपी, आमदार, खासदार होतो किंवा कुठले तरी अध्यक्षपद भूषवतो. प्रत्येकाची प्रचार करण्याची पद्धत वेगळी असते. यंत्रणा, उद्देश त्यातून येणारा फायदा जोखला जातो.
आपले नाव मतदारांच्या मनात कसे कोरले जाईल, याचा सातत्याने ते विचार करतात. जर तो निवडून आला आहे, तर कोणती सरकारी खाती आपल्याला उपयोगी पडतील हे पाहिले जाते. त्या खात्याचा विस्तृत उपयोग होतो की नाही हा भाग वेगळा. ज्यांना ‘मीडिया टीम’ परवडते तिथे, सेवा हा व्यवसाय आहे, हे गृहीत धरून ते ‘टीम’ घेऊन फिरतात.
ही ‘टीम’ वारंवार लक्षपूर्वक लोकप्रतिनिधीची प्रतिमा डागाळणार नाही, याची काळजी घेते. लोकप्रतिनिधींची भाषणं, बैठका, साऱ्याचे योजनाबद्धपणे थेट प्रक्षेपण हा लवाजमा करत असतो.
गैरव्यवहार, लोकप्रतिनिधीची ‘व्होट बँक’ कमी होणार नाही, हितसंबंध तुटणार नाहीत, मतदार नाराज होणार नाहीत, धार्मिक संतुलन, व्यावसायिक संस्था हे सर्व वरदहस्त जपले जातात. त्यासाठी कर्मचारी एका अर्थाने भागीदार असतात, कारण दक्षता. यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होतो.
कितीतरी लोकप्रतिनिधी पाहिले भाऊसाहेब असो वा पर्रीकर त्यांनी त्यांची प्रतिमा तयार करण्यासाठी ना जाहिरातबाजी केली, ना ‘टीम’ बाळगली.
आपलं ‘डायरेक्टोरेट ऑफ इनफार्मेशन अॅण्ड पब्लिसिटी’ आपली राजकीय मोहीम चालवतं. त्यातून वेगळे संदेश, स्वरूप, प्रकटीकरण होत असे. त्यांची गुणवत्ता, सत्यता सामान्य जनता पारखत असे. त्यांना डिजिटल, बातम्या, बॅनर, रस्त्यावर कॉलर, वर्तमानपत्र, रेडिओ सर्व माहिती आणि प्रसिद्धी खाते करत असे.
प्रेरक शब्दलेखन, नवीन योजना, पूर्ण पान जाहिरात समजू शकतो. पण ‘ब्रँड इमेज’ मजबूत करण्यासाठी हे फोटो बघवत नाहीत. मतदारांना आवडेल असे विधान टाका, ‘सस्पेन्स’ ठेवा जो आता चालू आहे, पुनर्मूल्यांकन करा, चवीप्रमाणे मीठ मसाला घालून कल्पनाशक्ती लढवून अळणी न करता प्रभावपूर्वक बातमी टाका.
आपला ‘ब्रँड’ उत्कृष्ट करा विकासाचे योगदान तर्कशुद्ध असते अन् मतदारांना आकर्षित करते. विवेक विचार विकणे आणि नैतिकतेचे आव्हान पेलणे हा उत्पादकाचा मुद्दा हवा. येन केन प्रकारेण त्याला जास्त शक्ती लागत नाही. राजकारणात ही सकारात्मक गुरुकिल्ली मानली गेली तर योग्य ठरेल.
सर्वांत महत्त्वाचे घटक ‘फेसबुक युजर्स’ त्यांचं पीक येतं. त्यांचं आशय, भाषा ह्यावर नियंत्रण नसतं. कदाचित तो ‘बायोडेटा’ देताना सर्वेसर्वा मानत असतील. ‘हॉलमार्क ऑफ फेम’ ही त्यांची ओळख. रस्त्यावर उतरून पोस्टर चिकटवण्याची लायकी नसते त्यांची. त्यांचा सहभाग, आघाडी, लक्ष्य एकच; विक्षिप्त, संतुलन गेल्यागत मुद्दा गहाण टाकून लिहिणे. उमेदवार राहिला बाजूला कुणाच्या वैयक्तिक जीवनावर अत्यंत घाण बोलणे. तेही लाचार होऊन केवळ पैशांसाठी. एकंदरीत सेवा ही अशी असावी का? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.