Mayem: नौका पर्यटन, स्थानिक बाजारपेठेत भटकंती; मये दर्शनमधून परिसराच्या इतिहासाची, वारशाची उजाळणी

Mayem village cultural tour: आमचा स्वतःचा परिसर नजरेत साठवून ठेवणे आणि त्यातील ध्वनी आणि गंधही स्वतःत समावून घेणे मस्त असते.
Boat In River
Boat In RiverX
Published on
Updated on

प्रवीण सबनीस, कॉर्पोरेट ट्रेनर

गेेल्या रविवारी मये सम्राट क्लबने मये दर्शन आयोजित केले होते, ज्यात गाव आणि आजूबाजूच्या परिसराचा प्रवास अंतर्भूत होता. आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. होडीमधून आम्ही नदीत नौका पर्यटनही केले. या कार्यक्रमात तिथल्या विविध सदस्यांनी गावचा मौखिक इतिहास आम्हाला सादर केला. हा इतिहास त्यांनी एका पुस्तिकेतही संकलित केला आहे. 

आम्हाला प्रवास करायला आणि नवीन ठिकाणी धुंडाळायला आवडते, नवीन ठिकाणांबद्दल अधिक जाणून घेणे आवडते. त्या ठिकाणांच्या माहितीचा पाठपुरावा करत आम्ही फोटो आणि व्हिडिओमध्येही त्यांना टिपत असतो. त्या जागेबद्दल अधिकाधिक माहिती देणाऱ्या स्थानिकांनाही त्यासाठीच आम्ही शोधत असतो. पण अनेकदा, आपण आपला स्वतःचा परिसर, त्याचा इतिहास आणि वारसा याविषयी मात्र अनभिज्ञ राहतो.

आपल्या स्वतःच्या परिसराबद्दल जाणून घेणे हा एक मजेदार आणि उपयोगी अनुभव असू शकतो. स्थानिक समुदायाबद्दल जाणून घेण्यासाठी तिथल्या विविध जागांवर आपला संचार आवश्यक आहे.  आमचा स्वतःचा परिसर नजरेत साठवून ठेवणे आणि त्यातील ध्वनी आणि गंधही स्वतःत  समावून घेणे मस्त असते.

Boat In River
Mayem: भरवस्तीत गव्यांचा कळप! मयेत भीतीचे वातावरण; काजू पिकांच्या हानीमुळे वाढली चिंता

स्थानिक बाजारपेठ आपण पालथी घातली पाहिजे आणि तिथले छोटे व्यवसायिक आणि कारागीर यांना पाठबळ दिले पाहिजे.  स्थानिक माहितगार वेगळी अंतर्दृष्टी देऊ शकतात. गोष्टी पूर्वी कशा होत्या हे त्यातून आपण जाणू शकतो आणि आता त्या कशा आहेत हे प्रत्यक्ष पाहू शकतो. वास्तविकतेची ही जाणीव आपल्या वारसाचे संरक्षण, पुनरुत्थान आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने आपली मदत करू शकते.

Boat In River
Goa Mangroves: खारफुटी क्षेत्र बचावासाठी सरकारचा मोठा निर्णय; अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणाबाबत मंत्री राणेंनी दिला स्पष्ट इशारा

अतिपरिचित असलेल्या आपल्या क्षेत्राचा पुनर्शोध घेऊन तिथला समुदाय आणि तिथली संस्कृती याबद्दल सखोल माहिती मिळवणे शक्य आहे. नवीन लोकांना भेटण्याची, नवीन गोष्टी करून पाहण्याची, लोकांकडे प्रदीर्घ नाते जुळवण्याची ही संधी असते. मग मये येथील आनंदी ‘सम्राटां’पमाणे आम्हीही आमचा परिसर समजून घेण्यास स्थानिकांना तसेच इतर भागातील लोकांना मदत करू शकतो.  लोकांना, वारसास्थळांना भेटा  ते तुम्हाला प्रिय होतील  तुमच्या परिसरात भटका  ते आनंदाचे होईल  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com