Goa History: सेशेल्समध्ये गुहेत पुरलेला आणि अजूनही न सापडलेला 'गोव्याचा खजिना'; गोळीबार न करता केलेल्या समुद्री लुटीची गोष्ट

Pirates and Treasure of Goa: समुद्री चाचेगिरीच्या योगायोगाने, नोसा सेन्होरा दा काबो जहाज काही दिवसांपूर्वीच एका तीव्र वादळात सापडले होते.
John Taylor and Olivier Levesque pirates treasure
Pirates and Treasure of GoaX
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

जॉन टेलर, एक इंग्रज, आणि ऑलिव्हियर लेव्हॅस्यूर, एक फ्रेंच, ज्यांना समुद्री लुटारू म्हणून ओळखले जाते, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर चाचेगिरीच्या प्रवासात हे दोघेही समुद्री लुटारू एकत्र आल्याने ऑलिव्हियर लेव्हॅस्यूरचे आयुष्यच बदलून गेले. त्यांच्या आयुष्यातली उल्लेखनीय घटना म्हणजे त्यांनी पोर्तुगिजांचे महान गॅलियन (जहाज)नोसा सेन्होरा दा काबोला (अवर लेडी ऑफ द केप) एकही गोळीबार न करता पकडणे.

एप्रिल १७२१मध्ये गोव्याचे बिशप आणि पोर्तुगीज व्हॉइसरॉय या महत्त्वाच्या व शक्तिशाली व्यक्तींना घेऊन एक मोठे ७०० टन गॅलियन नोसा सेन्होरा दा काबो जहाज लिस्बन पोर्तुगालला गोव्याहून परत येत होते. हे जहाज शस्त्रास्त्रांनी व ७२ तोफांनी सुसज्ज होते, किंबहुना, एक प्रथम श्रेणीची पोर्तुगीज युद्धनौका ज्यावर कोणीही हल्ला करण्याचा विचारही करणार नाही.

समुद्री चाचेगिरीच्या योगायोगाने, नोसा सेन्होरा दा काबो जहाज काही दिवसांपूर्वीच एका तीव्र वादळात सापडले होते. ज्यामुळे त्यांचे बरेच नुकसान झाल्यामुळे खराब स्थितीत होते आणि जहाजाच्या कॅप्टनला भीती वाटत होती की तो ७२ तोफांचा भार हलका न केल्यास जहाज बुडू शकते. त्यामुळे सर्व ७२ तोफा बाजूला पाण्यात फेकण्याचा आदेश देऊन त्याने तसे केले.

त्यामुळे, जहाज तर वाचले, पण हा निर्णय त्या कॅप्टनच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट निर्णयांपैकी एक ठरला. एकदा वादळ पार करून झाल्यावर दुरुस्तीसाठी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील रीयुनियन बेटावर नांगरले गेलेले हे जहाज तिथेच फिरत असलेल्या जॉन टेलर आणि ऑलिव्हियर लेव्हॅस्यूर या आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील चाचेगिरीच्या सर्वांत मोठ्या कारनाम्यांपैकी एक म्हणून लक्षात ठेवल्या गेलेल्या समुद्री लुटारूंना सापडले.

या समुद्री लुटारूंना एकही गोळीबार न करता जहाजावर चढता आले. लूट जवळजवळ वर्णनाच्या पलीकडे होती - सोने आणि चांदीच्या विटा, सोन्याची नाणी, हिरे, मोती, रेशीम, कलात्मक हस्तिदंती वस्तू आणि गोव्यातील सी कॅथेड्रलमधील धार्मिक वस्तूंनी भरलेले डझनभर पेट्या, तसेच गोव्याच्या प्रसिद्ध फ्लेमिंग क्रॉससह जे शुद्ध सोन्याचे बनलेले होते ज्यात अगणित हिरे, माणिक आणि पन्ना जडलेले होते.

असे म्हणतात फ्लेमिंग क्रॉस इतका जड होता की समुद्री लुटारू ऑलिव्हियर लेव्हॅस्यूरच्या जहाजावर नेण्यासाठी ३ माणसांची गरज पडली होती, खजिना इतका प्रचंड होता की समुद्री लुटारूंनी जहाजावरील लोकांना लुटण्याची तसदीही घेतली नाही. एरव्ही त्यांनी कुणासही सोडले नसते.

समुद्री चाचेगिरीच्या इतिहासातील कदाचित सर्वांत मौल्यवान खजिना असलेले पारितोषिक म्हणजे ७०० टन वजन असलेले पोर्तुगीज महान गॅलियन (जहाज)नोसा सेन्होरा दा काबो (अवर लेडी ऑफ द केप). जेव्हा लूट विभागली गेली तेव्हा प्रत्येक लुटारूला किमान ५०,००० सोन्याची नाणी, तसेच प्रत्येकी ४२ हिरे प्रत्येकाच्या वाट्याला मिळाले असे समुद्री लुटारू जॉन टेलरचा कैदी म्हणून वेळ घालवलेल्या जेकब डी बुक्वॉयने नोंदवले आहे. जॉन टेलर आणि ऑलिव्हियर लेव्हॅस्यूरने सोने, चांदी आणि इतर वस्तू विभाजित केल्या, ऑलिव्हियर लेव्हॅस्यूरने स्वतःला सोनेरी क्रॉस घेतला ज्याला प्रसिद्ध फ्लेमिंग क्रॉसही म्हणतात.

त्यानंतर हे दोन्ही समुद्री लुटारू ऑलिव्हियर लेव्हॅस्यूर आणि जॉन टेलर वेगळे झाले. जॉन टेलर परत अमेरिकेत कॅरिबियनला गेला जिथे तो अखेरीस समुद्री चाचेगिरीच्या शिकारीकडून पनामाच्या गव्हर्नरकडून माफीनामा विकत घेऊन स्पॅनिश सरकारच्या जहाजांचे समुद्री चाच्यांपासून संरक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या तथाकथित विंडवर्ड फ्लीटमध्ये रक्षक बनला.

स्पॅनिश पोर्टोबेलोच्या गव्हर्नरने टेलर आणि त्याच्या माणसांना त्याच्या कॅसांड्रा जहाजाच्या बदल्यात माफ केले. त्यानंतर टेलरने स्पॅनिश सेवेत प्रवास केला, टेलरचा कैदी म्हणून वेळ घालवलेल्या जेकब डी बुक्वॉयने नोंदवले आहे की टेलरने अखेरीस पोर्टोबेलो सोडले आणि क्युबाला परत जाण्यापूर्वी जमैका येथे आपल्या कुटुंबाकडे परतला, जेथे त्याने १७४४पर्यंत एक लहान व्यापारी जहाज चालवले.

John Taylor and Olivier Levesque pirates treasure
Goa History: रक्षणकर्त्या 'गावड्यांना' गोमंतकीय इतिहासाच्या पुस्तकात स्थान हवेच!

१७२४ मध्ये हिंद महासागरातील सर्व चाच्यांना फ्रान्सने माफीनाम्याची ऑफर दिली. ऑलिव्हियर लेव्हॅस्यूरने रीयुनियनच्या गव्हर्नरकडे एक वार्ताकार पाठवला आणि माफीनामा विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु फ्रेंच सरकारला त्याच्या चोरीच्या लुटीचा प्रसिद्ध सोनेरी फ्लेमिंग क्रॉसहित मोठा वाटा परत हवा होता, म्हणून ऑलिव्हियर लेव्हॅस्यूरने कर्जमाफी टाळण्याचा निर्णय घेतला आणि सेशेल्समध्ये गुप्तपणे स्थायिक झाला. अखेरीस तो फोर्ट डॉफिन येथे, आफ्रिकेच्या मादागास्कर जवळ पकडला गेला. त्यानंतर त्याला सेंट-डेनिस, रियुनियन येथे नेण्यात आले आणि ७ जुलै १७३० रोजी संध्याकाळी ५ वाजता चाचेगिरीसाठी फाशी देण्यात आली.

John Taylor and Olivier Levesque pirates treasure
Goa History: आदिलशाहीचे गतवैभव आणि गोव्याची सांस्कृतिक विविधता

त्याला फाशीच्या मचाणावर चढवत असताना,ऑलिव्हियर लेव्हॅसूरने त्याच्या गळ्यातील एक हार काढला आणि तो गर्दीत फेकून दिला आणि म्हणाला, ‘माझा खजिना शोधा, ज्याला तो समजेल!’ नेकलेसमध्ये अगदी सहज सोडवलेल्या सायफरमध्ये क्रिप्टोग्राम असल्याचे आढळले. परंतु हे कोडे उलगडल्यानंतर ते एक राशिचक्र, हर्क्यूलिसचे बारा श्रम, मेसोनिक विधी आणि इतर अस्पष्ट स्रोतांचा संपूर्ण संदर्भ देत असल्याचे दिसून आले.

त्यादिवसापासून आजपर्यंत अनेकांनी हा ऑलिव्हियर लेव्हॅसूरचा खजिना शोधण्याचे प्रयत्न केले आहेत. पण हा खजिना काही अजूनही सापडलेला नाही. रेजिनाल्ड क्रूस-विल्किन्सन नावाच्या इंग्रजाने तीस वर्षे हे गूढ व खजिना शोधासाठी स्वतःला वाहून घेतले आणि १९७७मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने तो शोध चालू ठेवला. कदाचित एक अब्ज डॉलर्स किमतीचे सोने आणि दागिने असलेल्या पोर्तुगीज गॅलियन नोसा सेन्होरा दा काबो या जहाजावरचा गोव्यातील खजिना अजूनही सेशेल्समध्ये बेटावर कुठेतरी गुहेत पुरलेल्या स्वरूपात सुरक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com