Goa opinion: "बाप्पा! बरो मरे? भाजी कसली आसा?"

Goan Food: जगाच्या पाठीवर गोमंतकीय कुठेही असो, पातळ भाजी अन् पोकळ पाव, मिरची, कापां, बटाटेवडे, बन्स, उंडे म्हटलं की मातृभूमीच्या सुखद आठवांनी गहिवरतो.
Food in Goa: जगाच्या पाठीवर गोमंतकीय कुठेही असो, पातळ भाजी अन् पोकळ पाव, मिरची, कापां, बटाटेवडे, बन्स, उंडे म्हटलं की मातृभूमीच्या सुखद आठवांनी गहिवरतो.
Goan Bhaji-Pav Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रा. विघ्नेश शिरगुरकर

प्रश्न खमंग असु शकतात? किंवा झणझणीत असु शकतात का? किंवा वाफाळते? होय!! नक्कीच!!! प्रश्न हे गरमागरम, खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, चटपटीत, झणझणीत व वाफाळतेही असु शकतात.

आता हेच बघा. तुम्ही कुठल्याही गोंयकाराच्या हॉटेलमध्ये गेलात की पहिला झणझणीत प्रश्न "पात्रांव"च्या दिशेने सोडता, 'भाजी कसली आसा?' ह्या प्रश्नाचं उत्तर तितकंच झणझणीत असतं. पात्रांवला उत्तरं तोंडपाठ असतात अन् पात्रांव सेहवागसारखा हा प्रश्न तटवतो व उत्तरादाखल काही तितकेच झणझणीत शब्द उच्चारतो. पातळ, सुकी, टमाट, सालाद, स्पेशल, बियाभाजी, वगैरे वगैरे.

मग धनुष्यावर बाण चढवून प्रत्यंचा ताणून सर्रकन सोडावा तसा, 'गरम कितें आसा?' हा प्रश्न आपल्या जिभेवरून सुटतो. हाही प्रश्न पात्रांव सेहवागसारखा सराईतपणे तटवतो. 'मिरची, कापां, समोसा, बटाटवडा, बन्स' हे शब्द झरझर वेगाने त्याच्या तोंडून बाहेर पडतात. आपल्याला ते अतिशय खुसखुशीत वाटतात. त्यातल्या त्यात जर का त्याने म्हटलं, 'आत्ता मिरची काडल्या!' किंवा 'मिरची सोडल्या' तर मग आपल्या मेंदूत डोपामाईन अगदी ठासून तयार होतं. ते‌ वाक्य, आत्ता मिरची सोडल्या असं असलं तरीही पुढची दहा-पंधरा मिनिटे आपण तोंडाला सुटलेलं पाणी व मेंदूत जमा झालेलं डोपामाईन थोपवून धरून ही सत्वपरीक्षा द्यायला तयार असतो. जिभेला धार काढून आपण चातकासारखी वाट पाहतो.

आधी मिठात मुरून व नंतर तिखट, मीठ, हळद, बेसन अन् मोहन म्हटल्या जाणाऱ्या गरमागरम तेलात लेवलेल्या पिठात गुरफटून, भयंकर तापलेल्या तेलात खरपूस भाजून तयार होणारी खमंग कुरकुरीत मिरची तर दुसरीकडे भट्टीतून टोपलीत, टोपलीतून हॉटेलात व हॉटेलातल्या रचून ठेवलेल्या ढीगातून अलगद बशीत बसून आलेला गरमागरम लुसलुशीत पाव म्हणजे आम्हा समस्त गोवेकरांचा जीव की प्राण.

कॅफे भोसले (Cafe Bhonsle) व कॅफे तातो (Cafe Tato) (मराठीत तात्या, कोकणीत तातो) ही राजधानी पणजीत वसलेली दोन्ही उंची हॉटेले तर गोमंतकीय आपल्या प्रातःकाळच्या दैनंदिन खाद्यसंस्कृतीचे मानबिंदू म्हणून मिरवतात.

पण अस्सल गोमंतकीय पातळ भाजीची अन् पोर्तुगीज खाद्य संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून मागे उरलेल्या पोकळ पावाची खरी चव चाखायची असेल तर अगदी गावातलं टिपिकल गावठी हॉटेल गाठल्याशिवाय तरणोपाय नसतो. प्लायवुड व लोखंडाची टेबले, प्लास्टिकच्या खुर्च्या, अशी एकुण अतिग्रामीण बैठक; प्लायवुड व काचा लावलेलं पारदर्शी शेल्फ व त्यात कडकातल्या कडक वा कर्मठातल्या कर्मठ डाएट उपासकाचा शीघ्र तपोभंग होईल अशा पध्दतीने परातीत ओतून ठेवलेल्या मिरच्या, बटाट्याची कापं, तळणीतला तप्त तैलप्रवास संपवून कढईतून परातीतल्या कागदावर येऊन विसावलेले बटाटेवडे, गोवन समोसे व बन्स असे सगळे पदार्थ पूर्णब्रह्म म्हणून सविनय सादर झालेले असतात.

Food in Goa: जगाच्या पाठीवर गोमंतकीय कुठेही असो, पातळ भाजी अन् पोकळ पाव, मिरची, कापां, बटाटेवडे, बन्स, उंडे म्हटलं की मातृभूमीच्या सुखद आठवांनी गहिवरतो.
Goan Food Recipe: सुंगटं घातलेल्या भाजीसाठी प्रसिद्ध गोपिका...

आतली धुरकटलेली स्वयंपाकाची खोली स्वच्छता व निर्जंतुक वातावरण हे दोन्ही घटकांना अंधश्रध्दा ठरवत अखंडपणे धगधगत असते.आणि हो बरं का! खरी चव चाखायची असेल तर या दोन्ही घटकांना अंधश्रध्दा ठरवूनच चाखायचं.

पात्रांव किंवा पात्रांवचा पोऱ्या आपल्यापाशी येतो. त्याला माहीत असतं आपल्याला काय हवंय अन् आपल्याला माहीत असतं की आपल्याला काय हवंय. दोघांनाही ठाउक असतं की काय हवंय पण दोघेही ही हवीहवीशी उपरोल्लेखित औपचारिकता करतात कारण सर्वोत्कृष्ट गोमंतकीय भाजीपेक्षा आणखीन काहीतरी सर्वोत्कृष्ट चाखायचं असतं. अशी एखादी वाटाण्याची पातळ भाजी जी चमचाभर चाखल्यावर अगदी ब्रह्मानंदी टाळी लागेल. अन् या स्वर्गसुखानंतर स्वर्गारोहण झालं तरीही पश्चात्ताप नसावा.

मौखिक औपचारिकता पूर्ण झाल्यावर पोऱ्या आतून चिनी मातीच्या गोल पांढऱ्या बशीतून चण्याची उर्फ वाटाण्याची पातळ भाजी घेऊन येतो. आणखीन एक गोष्ट सांगायची उरली बरं का! ती चिनी मातीची पांढरी बशी फार महत्वाची आहे. ती खरी झणझणीत वातावरणनिर्मिती करते अन् ती आतून हातात धरून आणताना त्या पोऱ्याने पाचही बोटानी वरून तोलून धरून आणली पाहिजे नाहीतर त्यात काही मजा नाही बुवा. हे कम्पल्सरी आहे. अहो शास्त्र असतं ते! खरा अस्सल जातिवंत गोंयकार हॉटेलकार हा मिरची न मागता देतो. जे मिरची हा भाजीपावातला अविभाज्य घटक विचारून देतात त्यांना मी गोवेकर मानतच नाही. भाजीसोबत पाव देताना मिरची ही आलीच.

तर!!! तुम्ही त्या झणझणीत भाजीवर, लुसलुशीत पावावर व खुसखुशीत मिरचीवर आडवा ताव मारला अन् शेवटच्या पावाच्या तुकड्यासोबत तुमची भाजी संपली देखील. पात्रांवचं अन् पोऱ्याचं तुमच्याकडे बारीक लक्ष असतं बरं का! तुमचा तो शेवटचा तुकडा संपायच्या आधीच लगबगीने तो तुमच्याजवळ येऊन आपले दोन्ही हात अदबीने पोटावर बांधून अगदी गोडपणे, 'चहा आणून?' हा गोड वाफाळता प्रश्न विचारतो. याही मोहाच्या क्षणाला आपण अलगद बळी पडतो. साधा व स्पेशल असे चहाचे दोन प्रकार पेडण्यापासून ते काणकोणपर्यंतच्या सर्व गोमंतकीय हॉटेलांत असतातच असतात. त्याने काचेच्या ग्लासमधून आणलेला साधा किंवा चिनी मातीच्या कपबशीतून आणलेला स्पेशल हे अमृततुल्य पेय रिचवून आपण आपल्या उदरभरण नावाच्या यज्ञकर्माची भैरवी करतो. या पुण्यकर्माला आणखीन दुसरी उपमा नाही.

Food in Goa: जगाच्या पाठीवर गोमंतकीय कुठेही असो, पातळ भाजी अन् पोकळ पाव, मिरची, कापां, बटाटेवडे, बन्स, उंडे म्हटलं की मातृभूमीच्या सुखद आठवांनी गहिवरतो.
Goan Food Culture: अशी बनवा पारंपारिक गोवन मिठाई 'बिबिंका'

जगाच्या पाठीवर गोमंतकीय कुठेही असो, पातळ भाजी अन् पोकळ पाव, मिरची, कापां, बटाटेवडे, बन्स, उंडे म्हटलं की मातृभूमीच्या सुखद आठवांनी गहिवरतो. क्षणभर त्याचं मन त्याच्या गावातल्या हॉटेलात धाव घेतं. तिथं कुणितरी, बाबला, बाप्पा, रामा, राजाराम, सुब्राय, तातो अशा असंख्य नावांनी पण एकाच नात्याने गुंफला गेलेला हॉटेलकार त्याची वाट बघत असतो.

अन् त्याला पाहून आगंतुकपणे आपल्या तोंडून एक खमंग असा प्रश्न बाहेर पडतो, "बाप्पा! बरो मरे? भाजी कसली आसा?"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com