दिगंबर कामत: 22 जागांची वल्गना करणाऱ्यांचा अहंकार लवकरच नष्ट

सध्याचे सरकार कर्मचाऱ्यांना स्वतःला मत देण्यासाठी दबाव आणत आहे: गिरीश चोडणकर
Digambar Kamat
Digambar Kamat Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला जास्त जागा मिळाल्या तरी आम्हाला याचे आश्चर्य वाटणार नाही, पण दुसरीकडे जे लोक 22 जागा आम्हाला मिळणारच हा अहंकार घेऊन आहेत, त्यांचा अहंकार 10 मार्चला जो निकाल येईल त्यावेळी नष्ट झालेला असेल. कारण सध्या त्यांचे पाय जमिनीवर नाहीत, पण निकालामुळे ते धाडकन तोंडावर आपटणार आहेत, अशी सडकून टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केली.

Digambar Kamat
बाबू आजगावकर: दिगंबर कामत मडगावकरांना मूर्ख बनवत आहेत

जनतेने आता हे पक्के ठरवले आहे की, गोव्याला काँग्रेस (congress) हा एकमेव पर्याय आहे. कारण त्यांना आमच्या कर्तृत्वावर आणि आमच्या तत्त्वांवर विश्वास आहे, असे मत कामत यांनी व्यक्त केले.

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी मतदानादिवशी आपली सेवा बजावली आहे, ते सरकारी कर्मचारी आत्ताच्या सरकारच्या दबावाखाली असल्याचे आमच्या निदर्शनास आले. सध्याचे सरकार या कर्मचाऱ्यांना स्वतःला मत देण्यासाठी दबाव आणत आहे, असे मत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com