Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Kavale Shree Shantadurga Temple Information: स्थलांतरित झालेल्या तसेच गोव्यातील मंदिरांप्रती आकर्षण असलेल्या कानडी व मराठी मंडळींच्या दृष्टिकोनातून एक खास आकर्षण म्हणजे श्री शांतादुर्गा देवस्थान, कवळे
Kavale Shree Shantadurga Temple Information: स्थलांतरित झालेल्या तसेच गोव्यातील मंदिरांप्रती आकर्षण असलेल्या कानडी व मराठी मंडळींच्या दृष्टिकोनातून एक खास आकर्षण म्हणजे श्री शांतादुर्गा देवस्थान, कवळे
Kavale Shree Shantadurga Temple Information:Shree Shantadurga Vijayate
Published on
Updated on

Shree Shantadurga Temple, Kavale, Ponda History in Marathi

प्रा. विघ्नेश शिरगुरकर वांते, सत्तरी गोवा

(vighneshshirgurkar@gmail.com)

कवळे: गोमांतकात शिव व शक्तीची उपासनेचे फार मोठे प्रस्थ आहे व त्याचा प्रत्यय कोणत्याही मूळ गोमंतकीय कुटूंबाच्या कुलदेवता व सहदेवतेच्या नावावरूनच येतो. जसे की मंगेश महालक्ष्मी, नागेश महालक्ष्मी, शांतादुर्गा रवळनाथ, महालक्ष्मी रवळनाथ, इत्यादी.

आपल्या नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने गोव्याबाहेर वास्तव्य करून असणाऱ्या किंवा अनेक शतकापुर्वी गोव्यातून विस्थापित वा स्थलांतरित झालेल्या तसेच गोव्यातील मंदिरांप्रती आकर्षण असलेल्या कानडी व मराठी मंडळींच्या दृष्टिकोनातून श्री मंगेश हे एक खास आकर्षण आहे तसेच आणखीन एक खास आकर्षण म्हणजे श्री शांतादुर्गा देवस्थान, कैवल्यपूर (कवळे).

उपरोल्लेखित दोन्ही देवस्थाने ही त्यांच्याशी संलग्न वा संबंधित असलेल्या लब्धप्रतिष्ठित अशा महाजनवर्गासाठी व झुंडीने भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीसाठी ओळखली जातात. आजन्म स्वरसेवी राहिलेल्या मंगेशकर कुटूंबाचे मूळ गाव म्हणून मंगेशी हे प्रसिद्ध आहे तर कवळे येथे वसलेल्या कवळे श्री गौडपादाचार्य मठ तसेच शाङ्कर वेदपाठशाळेसाठी शांतादुर्गा देवस्थान प्रसिद्ध आहे.

इतिहास (History of Shree Shantadurga Temple, Kavle Ponda)

प्रस्तुत लेखासाठी वाचनात आलेल्या संदर्भ ग्रंथानुसार हे देवस्थान सासष्टी वा साष्टी वा सालसेत तालुक्यातील केळशी (केळोशी/ कर्दलीपूर/ Quelossim/Cavelossim) या गावातून साधारणतः १४ जानेवारी १५६६च्यानंतर व २९ नोव्हेंबर १५६६च्या पुर्वी कवळे या गावी स्थलांतरित झाले असावे.

छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारात १७१३ सरदार नारोराम शेणवी रेगे यांना मंत्रिपद लाभल्यावर त्यांनी ह्या मंदिराचे बांधकाम करून घेतले. आपल्याला सर्व ऐश्वर्य, पद, प्रतिष्ठा व मान मरातब हा देवीच्या कृपेनेच मिळाला ह्या जाणिवेने त्यांनी अंदाजे १७३० ते १७४० दरम्यान देवालयाच्या बांधकामास आरंभ करून इतर महाजनांच्या सहाय्याने सध्या अस्तित्वात असलेले भव्यदिव्य असे मंदिर बांधून पूर्ण केले.

Shree Shantadurga Vijayate

वेळोवेळी परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार या देवालयाची डागडुजी करण्यात आली. १९६५ ते १९६६ साली शेवटची मोठी डागडुजी करण्यात आली. १८९८ साली काही पठाणांनी गर्भगृहात मुख्यासनावर स्थापित देवीची मूर्ती चोरून नेली होती. ही चोरी झाल्यावर तात्पुरती व्यवस्था म्हणून कवळे मठातली मूर्ती तिथे नित्य पुजेसाठी बसवण्यात आली. १९०१ साली लक्ष्मण कृष्णाजी गायतोंडे व कारकल या शिल्पकारांकडून नवीन मूर्ती करवून सुप्रतिष्ठित करण्यात आली असा उल्लेख आढळतो.

महत्व (Importance Of Shantadurga temple in Marathi)

फोंडा शहराच्या पश्चिमेस वसलेले हे देवालय श्री गौडपादाचार्य मठासाठी नावाजले जाते तसेच तेथे मठ संचलित श्री शाङ्कर वेदपाठशाळेसाठी देखील नावाजले जाते. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक व भारतातील इतर राज्यातून पंचगौड तसेच पंचद्रविड शाखेतील मुंज झालेले विद्यार्थी वेदाध्ययन करण्यासाठी येथे येऊन वास्तव्य करतात. या वेदपाठशाळेने गौड व द्रविड शाखांमधून अनेक वेदशास्त्री घडविले आहेत.

Kavale Shree Shantadurga Temple Information: स्थलांतरित झालेल्या तसेच गोव्यातील मंदिरांप्रती आकर्षण असलेल्या कानडी व मराठी मंडळींच्या दृष्टिकोनातून एक खास आकर्षण म्हणजे श्री शांतादुर्गा देवस्थान, कवळे
Goa Navratri 2024: पोर्तूगीजांच्या भीतीपोटी स्थलांतर; श्री कामाक्षी रायेश्वर संस्थानाचा इतिहास जाणून घ्या

वैशिष्ट्य (Significance Of Shantadurga temple in Marathi)

हे देवस्थान पुर्वाभिमुख आहे. श्री शांतादुर्गा देवालयाचा कळस जो गर्भागाराच्या वरील घुमटावर स्थापिलेला दिसतो तो कळस गोमंतकातील इतर कोणत्याही देवस्थानातील देवालयाच्या कळसापेक्षा उंच आणि उत्तम असल्याची ख्याती आहे आणि म्हणूनच श्री मंगेश देवालयाचा खांब अथवा दीपस्तंभ, श्री शांतादुर्गा देवालयाचा कळस, श्री महालक्ष्मी देवालयाचा चौक, श्री महालसा देवीचे स्थळ आणि श्री नागेश देवालयाचा तलाव ही सर्व गोमंतकातील प्रमुख देवस्थानांची वैशिष्ट्ये किंवा त्या त्या देवालयांच्या वास्तुप्राकारचा उत्तम भाग म्हणून प्रसिद्ध आहेत.

Shree Shantadurga Vijayate

श्रीच्या देवालयाच्या समोरच खोदून बांधलेला चिरेबंदी तलाव हा तर अतिशय सुंदर व नयनरम्य आहे. या तळीत उत्सवसमयी श्रीचा नौकाविहार होतो.

नवरात्री उत्सव (Navratri Celebration in Goa)

श्री शांतादुर्गा देवालयाचे नवरात्रौत्सवातील कार्यक्रम हे अत्रुंज महालातील(तालुका) इतर प्रमुख व प्रसिद्ध देवस्थानाच्या कार्यक्रमांशी साधर्म्य असणारे आहेत. फक्त इतर देवस्थानांशी संबंधित कुळावींना ह्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे यासाठी किर्तन, गर्भगृहातील आरती, मखराची आरती व प्रसाद वितरण हे ०८:३० ते ११:३० या दरम्यान पुर्वनियोजनानुसार होतात‌.

तत्पूर्वी गोवा व महाराष्ट्रातील प्रतिष्ठित गायकी घराण्यांशी संबंधित नामवंत वाद्यवृंद व गायकांचे गायनाचे कार्यक्रम सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान आयोजित केलेले असतात. एकुण पाहता देवस्थानात नवरात्रीनिमित्त भरगच्च कार्यक्रम ठरलेले असतात.

Shree Shantadurga Vijayate

कुठे थांबाल? (Where to stay in Goa?)

इतर सर्वसाधारण गोमंतकीय मंदिरांसारखी याही मंदिराभोवती अग्रशाळा, सभागृह, संस्थान कार्यालये बांधलेली आहेत. देवस्थानच्या भक्तनिवासात फक्त भक्तमंडळींना खोली मिळते, पर्यटकांना मिळत नाही. पण फोंडा, मडगांव तसेच आर्ले, फातोर्डा, रावणफोंड हे मडगावचे उपनगरीय भाग व वेर्णा या ठिकाणी स्वस्तात हॉटेल्स उपलब्ध आहेत.

खर्च (Cost)

हे तसेच फोंडा तालुक्यातील इतर देवस्थानाचे दर्शन एकत्रित हिशेबात धरल्यास एका दिवसाचा खर्च सुमारे ₹३०००-४००० होतो. ज्या देवस्थानात दुपारी व रात्री अन्नसेवा असते तिथल्या उत्कृष्ट अन्नदानाचा लाभ घेण्यासही हरकत नसावी.

हे करा (Do's)

  • या देवस्थानात कार पार्कींग करताना आपल्यामुळे इतरांना कार हलवण्यास त्रास होणार नाही हे पाहणे आवश्यक आहे. कार योग्य ठिकाणी पार्क करा.

  • चपलासाठींचा स्टँड असतो त्या ठिकाणी चपला ठेवणे बंधनकारक आहे.

  • देवीचे दर्शन रांगेत उभे राहूनच घ्या.

Shree Shantadurga Vijayate
  • मंदिरातील पुजारी वा विश्वस्तांनी सांगितल्यास अन्नसंतर्पण वा अन्नसेवेचा लाभ घ्या.

  • देवळात जाताना अंगभर कपडे घालून जा.

  • शांतता राखा.

  • शिस्त पाळा

  • या मंदिरात महाजनांनी, भक्तांनी व पर्यटकांनी जबाबदारीने वागणे बंधनकारक आहे.

हे करू नका (Dont's)

  • देवळात जाताना मद्यपान व मांसाहार करून प्रवेश करू नये, केल्यास देवळात जाऊ नये.

  • बेशिस्तपणे पार्कींग करणे टाळा, यामुळे परगावातील व परराज्यातून येणाऱ्या भक्तांची अडचण होते.

  • तोकडे कपडे घालून देवळात जाणे टाळावे.

  • उगाच मोठ्या आवाजात बोलणे टाळावे.

  • सभामंडपात गोंधळ वा गोंगाट करू नये.

Shree Shantadurga Vijayate
  • आपल्या मुलांना देवस्थान प्रकारात हवे तसे खेळू देणे टाळावे.

  • प्रदक्षिणा प्रकारात शीळ घालणे टाळावे.

  • मखरोत्सव व आरती झाल्यावर प्रसाद वितरण झाल्याशिवाय सभामंडपातून उठू नये.

  • प्रसादाचा त्याग करू नये, प्रसाद स्विकारल्यानंतर त्याचे सेवन करणे बंधनकारक आहे.

  • अन्नसेवेचा लाभ घेताना पानात अन्न टाकणे टाळावे, देवाचा प्रसाद टाकू नये ही अन्नसेवेची शिस्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com