Hartalika Tritiya 2025: अखंड सौभाग्य आणि सुयोग्य वरासाठी 'हरितालिका व्रत'; वेळ आणि पूजेची पद्धत काय? सविस्तर जाणून घ्या
Hartalika Tritiya Shubh Muhurat: हिंदू धर्मात हरतालिका व्रताला विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हा विवाहित महिला हरितालिकची पूजा करतात, तसेच पूर्णदिवस उपवास देखील ठेवला जातो. हा उपवास मुख्यत्वे विवाहित महिला अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करतात, तर अविवाहित मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठी करतात. पौराणिक कथेनुसार, माता पार्वतींनी भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हा उपवास केला होता. हा उपवास केल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढते आणि घरात सुख-समृद्धी नांदते अशी संकल्पना आहे.
शुभ मुहूर्त आणि योग (Hartalika Tritiya Pooja Time)
यावर्षी, २०२५ मध्ये, हरतालिकेचे व्रत आणि उपवास २६ ऑगस्ट, मंगळवार रोजी करण्यात एणार आहे. या दिवशी अनेक शुभ योग तयार होत असल्याने या पूजेचे फळ अधिक मिळेल. हरितालिकच्या व्रतासाठी शुभ मुहूर्त खालील प्रमाणे आहेत:
सकाळी ०५:५६ ते ०८:३१ पर्यंत
पूजेसाठी आवश्यक वस्तू कोणत्या? (Hartalika Tritiya Pooja Steps)
हरतालिकेची पूजा ही काही विशिष्ट सामानाशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे पूजेपूर्वी ही यादी एकदा नक्की तपासा.
पूजेसाठी: चौरंग, केळीचे खोड, तुळशीची पानं, आंब्याचे पान, नारळ, कुंकू, हळद, शेंदूर, चंदन, अक्षता, सुपारी, फुलं.
नैवेद्यासाठी: मिठाई, फळे, लाडू.
इतर सामग्री: कलश, दिवा, अगरबत्ती, धूप.
पूजेची पद्धत
हरतालिका व्रताचा उपवास पूर्ण दिवस केला जातो, याची सुरुवात सकाळी स्नान आणि पूजा करून होते. हरितालिका पूजेची पद्धत खालीलप्रमाणे:
१. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.
२. यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची पूजा करा.
३. हरितालिकेची पूजा करताना सोबत सनकाराची पिंडी आणि नंदीला देखील विशेष महत्व आहे.
४. हरितालीच्या पूजेत विशिष्ट पत्री अर्पण केली जाते.
५. पूजेनंतर ब्राह्मणाला वाण दान द्या.
६. संध्याकाळी पुन्हा एकदा हरतालिकेची आरती करा.
७. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीनंतर उत्तरपूजा करून या व्रताची सांगता करा.
या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी दिवसभर उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडून अन्न ग्रहण करावे अशी पौराणिक मान्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.