Goa Shravan Recipes: तेरां दुधीची भाजी, रोस, उड्डमेठी, मनगणे, मुठल्या; ताटात वेगळेपण आणणारा श्रावण

Goa Shravan Culture: जू न-जुलै महिन्यात संततधार बरसणाऱ्या पावसाचा श्रावणात उन्हासोबत लपंडावाचा खेळ सुरु होतो. निसर्गचक्राचे वेगळेच आवर्तन श्रावणाच्या निमित्ताने सुरु होते.
Goa Shravan month food
Goa Shravan month foodDainik Gomantak
Published on
Updated on

मनस्विनी प्रभुणे नायक

जू न-जुलै महिन्यात संततधार बरसणाऱ्या  पावसाचा  श्रावणात उन्हासोबत  लपंडावाचा  खेळ सुरु होतो. निसर्गचक्राचे वेगळेच आवर्तन श्रावणाच्या निमित्ताने सुरु होते. प्रत्येक ऋतू आपली किमया दाखवून देतो. श्रावणात मध्येच ऊन आणि मध्येच  पाऊस तर कधी ऊन-पाऊस असे दोन्ही एकाच वेळी अनुभवायला मिळते.

पाऊस सुरु होण्याआधीच दिवस आठवून बघा- पावसाचा सुगावा लागताच ऊन कसे गायबच होऊन जाते. ज्येष्ठ-आषाढात ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. त्या मासात सूर्याला ढगांच्या आड पाठवून स्वतः मनसोक्त बरसणाऱ्या पावसाला श्रावण उजाडताच त्या ढगांआड दडलेल्या आपल्या मित्राची आठवण होते. उन्हाचा हात धरून मग त्याचा खेळ सुरु होतो. 

हे सगळं जरी असलं तरी गोव्यात श्रावण म्हणताच अनेकांच्या डोळ्यासमोर 'शिवराक' पदार्थ येतात. असा अख्खा महिना खाद्यपदार्थांना आणि ते देखील शाकाहारी पदार्थांना वाहणं, हे उदाहरणच किती सुंदर वाटतं ना!

'खाण्यासाठी जन्म आपुला' हे ब्रीद वाक्य म्हणणाऱ्यांसाठी श्रावण महिना भरभरून देणारा आहे. गोंयकारांसाठी तसं 'शाकाहारी' प्रकरण सोप्पं नाही. महिनाभर 'शिवराक' राहायचं म्हणजे तयारी हवीच ना. वर्षभरात शिवराक पदार्थांकडे काणाडोळा करणारे श्रावणाच्या निमित्ताने गोड मानून खाऊ लागतात.

वजन कमी करण्याच्या बहाण्याने देखील श्रावण महिना कडक पाळणारे अनेकजण अलीकडे आजूबाजूला दिसतात. कारण काहीही असो यानिमित्ताने चविष्ट असे शाकाहारी पदार्थ ‘स्वाहा’ होतात हे महत्त्वाचे. 

Goa Shravan month food
Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

गोवेकर मंडळींचं मासळीवर मनापासून प्रेम असलं तरी इथल्या घराघरांत श्रावण महिन्यात अतिशय रुचकर शाकाहारी पदार्थ बनवले जातात. वर्षभर कधीही ताटात न पडणाऱ्या भाज्या या निमित्ताने मुद्दाम आणल्या जातात. यात आकूर, फागला, तेरां दुधीची भाजी, नीर फणसाची भाजी, तळलेली दुधीची फुलं, मस्काची भाजी, रोजच्या दुपारच्या जेवणात भातासोबत वेगवेगळ्या पद्धतीचे 'रोस'- सार जेवणाची रंगत वाढवतात.

वेगवेगळ्या प्रकारचे सांसव, उड्डमेठी, तोंडी लावायला केलेले कुवळ असे कितीतरी पदार्थ जिभेची रूच बदलून टाकतात.  गोड पदार्थांची विविधता याच काळात बघायला मिळते. सुकूर उंडे, पातोळ्या, मनगणे, मुगाचे कण्ण, पायस, मुठल्या, केळ्याचा -आंब्याचा हलवा पानाची शोभा वाढवतात.

Goa Shravan month food
Shravan Horoscope: श्रावणापूर्वीच होणार 'शिवाची कृपा'! गजकेसरी आणि मालव्य राजयोग; वृषभ, मिथुन, कर्क, वृश्चिक राशींना धनलाभ आणि सुखसमृद्धी

सर्व महिन्यांमध्ये श्रावण आपलं वेगळेपण ठेवून असतो आणि हे वेगळेपण स्वयंपाकघरात अगदी उठून दिसते. कधी नव्हे ते शाकाहारी पदार्थांची चर्चा सुरू होते. आता ज्यांच्या घरी वर्षातले ३६५ दिवस शिवराकच खाल्ले जाते त्यांना याचं फार विशेष वाटणार नाही, पण ज्यांच्या घरी तिन्हीत्रिकाळ ‘नुस्ते’ (मासळी) असते त्यांच्यासाठी श्रावण विशेष असतो.

श्रावण महिन्यासारखं  प्रेम-कौतुक दुसऱ्या कोणत्याही महिन्याला मिळत नाही. निसर्ग आपल्याला इतका भरभरून देतो की त्याचं प्रतिबिंब आपोआप आपल्या ताटात श्रवणमासाच्या  निमित्ताने दिसू लागतं. खवय्या मंडळींकडून श्रावणाचं स्वागत होत असताना आपणदेखील श्रावण उत्सव हा 'खाद्य उत्सव' म्हणून साजरा करुया. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com