हवामानातील बदल हा सध्या जगासाठी महत्वाचा मुद्दा बनला आहे. बदलत्या हवामानाचे परिणामही समोर येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो अलीकडेच संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संघटनेने आर्क्टिक प्रदेशातील हवामानाची माहिती दिली आहे. आर्क्टिकमध्ये 38 डिग्री सेल्सियस किंवा सुमारे 100 डिग्री फॅरेनहाइट तापमानाची नोंद झाल्याचे या माहितीत उघड झाले असून हि चिंताजनक बाबा आहे
आर्क्टिक (Arctic) सर्कलपासून 115 किमी अंतरावर असलेल्या सायबेरियातील वर्खोयन्स्क शहरात जून 2020 मध्ये हे तापमान नोंदवले गेले होते. हि चिंतेची बाब आहे कारण आर्क्टिकपेक्षा भूमध्यसागरीय प्रदेशात असे तापमान जास्त असते. गेल्या वर्षी आर्क्टिक (Arctic) सायबेरियामध्ये उन्हाळी हंगामात, तापमान सरासरीपेक्षा 10 डिग्रीवर पोहोचले. त्याचा परिणाम भारतासह (India) अनेक देशांमध्ये दिसून येईल .
* आर्क्टिकमध्ये ज्या प्रकारे तापमान वाढत आहे. त्यावरून हवामानातील (weather) बदल दिसून येतो. परिणामी सायबेरियामध्ये विनाशकारी आणि व्यापक आग लागण्याच्या घटना घडल्या. तसेच आर्क्टिक समुद्रात उन्हाळी (Summer) हंगाम संपण्यापूर्वी मोठया प्रमाणात गोठलेले पाणी वाया गेले. याचा परिणाम म्हणजे बर्फ वेगाने वितळत आहे. आर्क्टिकमधील नद्या 12 टक्के जास्त वितळत आहेत, यामुळे बरेच बदल होत असल्याचे अनेक अहवालातून समोर आले आहे. षिवाय अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडला आहे .
भारतात काय परिणाम होईल?
आर्क्टिक हवामानाचा भारतासह (India) अनेक देशांवर परिणाम होतो. जर आर्क्टिकमधील तापमान असेच कमी होत राहिले तर समुद्राची पातळी वाढण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे समुद्रालगत असलेल्या शहरांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिकमधील बर्फ सतत वितळल्यामुळे,सागरी परिसंस्था खूप वेगाने खराब होत आहे. याशिवाय भारतातील मान्सून इत्यादींवरही त्याचा परिणाम होत आहे. अशा स्थितीत असे म्हणता येईल कि, आर्क्टिकमधील तापमान अशाच प्रकारे वाढले, तर भारतासह अनेक देशांना ते कठीण होऊ शकते. भारताच्या संदर्भात हि बाब गंभीर आहे कारण जेव्हा आर्क्टिकमध्ये तापमान 38अंशावर गेले होते, त्या वेळी मुंबईतील (Mumbai) तापमान आणखी कमी होते. म्हणजेच आर्क्टिकमध्ये मुंबईपेक्षा जास्त तापमान होते जे सहसा होत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.