Non-Veg Milk: 'नॉन-व्हेज मिल्क' म्हणजे काय? भारत-अमेरिका वादाचं कारण बनलेलं काय आहे हे दूध?

Non Veg Milk Controversy: गेल्या काही काळापासून सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये "नॉन-व्हेज मिल्क" या शब्दाने खळबळ उडवून दिली आहे.
Non Veg Milk Controversy
Non-Veg MilkDainik Gomantak
Published on
Updated on

Non Veg Milk Controversy: गेल्या काही काळापासून सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये "नॉन-व्हेज मिल्क" या शब्दाने खळबळ उडवून दिली आहे. हा शब्द ऐकल्यावर अनेकांना धक्का बसतो, कारण दूध हे परंपरेने शाकाहारी मानले जाते. मग, हे दूध "मांसाहारी" कसे असू शकते? विशेष म्हणजे, हे "नॉन-व्हेज मिल्क" (Non-Veg Milk) भारत आणि अमेरिका यांच्यातील एका मोठ्या व्यापार करारात अडथळा बनले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात नेमके काय सुरु आहे, हे आपण नंतर पाहू, पण त्याआधी हे "नॉन-व्हेज मिल्क" काय आहे, ते समजून घेऊया.

काय आहे हे "नॉन-व्हेज मिल्क"?

सर्वसामान्यपणे, आपण दूध (Milk) हे शाकाहारी उत्पादन मानतो, कारण ते वनस्पतींपासून नाहीतर प्राण्यांपासून (उदा. गाय, म्हैस) मिळते. पण "नॉन-व्हेज मिल्क" या शब्दाचा संबंध थेट दुधाच्या गुणधर्मांशी नसून, ज्या प्राण्यांपासून ते दूध मिळते, त्यांच्या खाद्याशी (Animal Feed) आहे.

Non Veg Milk Controversy
America RIMPAC Exercise: अमेरिका आणि इस्रायलसोबत भारताचा मोठा लष्करी सराव, काय आहे प्लॅन?

अमेरिकेतील काही ठिकाणी दुभत्या जनावरांना, विशेषतः गाईंना, अधिक दूध उत्पादन व्हावे यासाठी त्यांच्या आहारात प्राण्यांपासून मिळणाऱ्या घटकांचा समावेश केला जातो. यामध्ये डुकराचे, माशांचे, कोंबडीचे, घोड्याचे आणि काहीवेळा मांजर किंवा कुत्र्यांच्या अवयवांचा समावेश असू शकतो. प्रोटीन आणि वजन वाढवण्यासाठी त्यांना प्राण्यांचे ब्लड आणि फॅट (Fat) देखील खाऊ घातले जाते, अशी माहिती विविध अहवालांमधून समोर आली आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ज्या गाईंना किंवा इतर दुभत्या जनावरांना मांस, ब्लड किंवा प्राण्यांच्या अवशेषांपासून बनवलेले खाद्य दिले जाते, त्यांच्या दुधाला "नॉन-व्हेज मिल्क" असे संबोधले जात आहे. हे दूध थेट मांसाहारी नसले तरी, ते मांसाहारी खाद्य खाणाऱ्या प्राण्यांपासून मिळते, त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून काही गट त्याला मांसाहारी मानतात.

Non Veg Milk Controversy
America Sanctioned: गाझावासीयांना खलनायक ठरवणाऱ्या इस्रायलच्या ‘या’ संघटनेवर बंदी; अमेरिकेची मोठी कारवाई

भारत-अमेरिका व्यापार करारातील अडथळा

भारत (India) आणि अमेरिका यांच्यात कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील व्यापार करारावर चर्चा सुरु आहे. अमेरिका भारताला त्यांचे डेअरी उत्पादने आयात करण्यासाठी बाजारपेठ खुली करण्याची मागणी करत आहे, कारण अमेरिका हा जगातील एक प्रमुख डेअरी उत्पादक देश आहे.

मात्र, भारताने या मागणीला विरोध केला आहे. भारताची अशी भूमिका आहे की, भारतीय संस्कृतीत गायीला पवित्र मानले जाते आणि बहुसंख्य भारतीय लोक शाकाहारी आहेत. ज्या गायींना मांसजन्य पदार्थ खाऊ घातले जातात, त्यांचे दूध आयात करणे हे भारतीय नागरिकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावनांच्या विरोधात आहे. त्यामुळे, भारत अशा "नॉन-व्हेज मिल्क" किंवा मांसाहारी खाद्य खाणाऱ्या प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर कडक निर्बंध घालत आहे आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहे.

Non Veg Milk Controversy
America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

दरम्यान, या मुद्यावर दोन्ही देशांमध्ये अजूनही एकमत झालेले नाही आणि त्यामुळेच भारत-अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटीत "नॉन-व्हेज मिल्क" एक मोठा अडथळा ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com