
भारत आणि पाकिस्तानमधील सध्याचा लष्करी तणाव कमी झाला आहे. दोन्ही देशांमधील एकमतानंतर ७ मे च्या रात्रीपासून पाकिस्तानकडून केले जाणारे ड्रोन हल्ले थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागातील बैसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केल्यावर भारत आणि पाकिस्तानमधील हा मुद्दा आणखी वाढला.
या क्रूर घटनेनंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. देशातील सर्व भारतीय क्रिकेटपटूंनीही यावरून पाकिस्तानवर टीका केली. पहलगाम येथील हल्ल्यानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी दहशतवादाला पोसणाऱ्या आपल्या देशाचे रक्षण करत होता. त्याने पहलगाम हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरलं होतं.
मात्र, आता शाहिद आफ्रिदीचा निर्लज्जपणा इतका टोकाला पोहोचला की त्याने युद्धबंदीला पाकिस्तानचा विजय घोषित केले. पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने रविवारी कराचीतील येथे एक रॅली काढली. रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहिद गाड्यांच्या ताफ्यासोबत दिसत आहे.
व्हिडीओमध्ये, आफ्रिदी पाकिस्तानी लष्कराच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. का एक्स सोशल मीडिया यूजरने हा व्हिडीओ शेअर करत, पाकिस्तानचा विजय साजरा करण्यासाठी शाहीद अफ्रिदीने ही रॅली काढली आहे. बुम बुम आमचा पाकिस्तानच्या लष्कराला पाठिंबा’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर यूजरने कमेंट करत आफ्रिदीला ट्रोल करत आहेत. एका युजरने यांचा देशच पागल असल्याचं म्हटलं आहे. तर अजून एका युजरनं हा पाकिस्तानचा पुढचा इमरान खान होणार असल्याचं म्हणत खिल्ली उडवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.