मोदींच्या ऐतिहासिक भेटीत बायडन महात्मा गांधींची आठवण काढत म्हणाले...

"माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे हार्दिक स्वागत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो."
Prime Minister Narendra Modi & Joe Biden
Prime Minister Narendra Modi & Joe BidenTwitter/ ANI
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्यात शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये (White House) पहिली द्विपक्षीय बैठक पार पडली. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे आभार मानत म्हणाले, "माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे हार्दिक स्वागत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो." याआधीही आम्हाला चर्चा करण्याची संधी मिळाली होती आणि त्या वेळी तुम्ही भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांसाठी तुमची दृष्टी मांडली होती. आज, तुम्ही भारत-अमेरिका संबंधांसाठी तुमचे व्हिजन अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेत आहात.

जो बायडन म्हणाले, 'माझा विश्वास आहे की, अमेरिका-भारत (US-India Relationships) संबंध आपल्याला अनेक जागतिक आव्हाने सोडवण्यात मदत करु शकतात. खरं तर 2006 मध्ये जेव्हा मी उपराष्ट्रपती होतो, तेव्हा मी म्हटलं होतं की, 2020 पर्यंत भारत आणि अमेरिका हे जगातील सर्वात जवळचे मित्र देश असतील. आपण तुमच्या नेतृत्वाखाली ज्या संबंधाची रुजवणूक करणार त्याचीच परिणिती म्हणून भारत-अमेरिकेच्या संबंधाची दृढता दिसणार. जगातील लोकशाही देशांना हा काळ अधिक आव्हानांचा आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये परिवर्तन दिसून येत आहे. मी पाहतो आहे की, आपण लोकशाही परंपरा आणि मूल्यांना समर्पित आहोत, ती परंपरा, त्याचे महत्त्व येत्या काळात अधिक वाढेल.

Prime Minister Narendra Modi & Joe Biden
मोदी, बायडन यांच्यात आज ऐतिहासीक बैठक,दहशहतवादासह अनेक मुद्द्यांवर चर्चा

पंतप्रधान मोदींनी बायडन यांचे कौतुक केले

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे (PM Modi Meet US President) भेटीदरम्यान कौतुक केले. ते म्हणाले, 'पदभार स्वीकारल्यानंतर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात एक अनोखा पुढाकार घेतला आहे, मग ते कोविड असो, हवामान बदल असो किंवा क्वाड. ज्याचा येत्या काळात मोठा परिणाम होईल. मला खात्री आहे की, आजच्या आमच्या संभाषणात आपण या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करु शकतो. आपण एकत्र पुढे कसे जाऊ शकतो, जगासाठी येत्या काळात काय अधिक चांगले असू शकते याचा अर्थपूर्ण विचार करु शकतो.

सभेत महात्मा गांधींचा संदर्भ दिले गेले

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'राष्ट्रपती जो बायडन यांनी गांधीजींच्या जयंतीचा उल्लेख केला. गांधीजी ट्रस्टीशिपबद्दल बोलले होते की, अवधारणा जी आपल्या येत्या काळात खूप महत्वाची आहे. हे विश्वस्त त्या ट्रस्टीशिपसाठी देखील खूप महत्वाचे आहे, महात्मा गांधींनी नेहमीच आम्ही या ग्रहाचे विश्वस्त आहोत असा सल्ला दिला. हा ट्रस्टीशीप स्पिरिट भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये महत्वाची भूमिका बजावेल.

Prime Minister Narendra Modi & Joe Biden
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांची भेट, पाकिस्तानसह या मुद्द्यांवर चर्चा

व्यापार आणि तंत्रज्ञान चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी व्यापाराच्या मुद्यावरही चर्चा केली. ते म्हणाले, 'भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापाराला अधिक महत्त्व आहे. या दशकात देखील आम्ही व्यवसाय क्षेत्रात एकमेकांना खूप मदत करु शकतो. अमेरिकेकडे भारताला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी आहेत. भारताकडे अशा गोष्टी आहेत ज्या अमेरिकेसाठी उपयुक्त ठरू शकतात. पीएम मोदी तंत्रज्ञानावर म्हणाले, 'तंत्रज्ञान हे एक प्रेरक शक्ती बनत आहे. मोठ्या जागतिक हितासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या प्रतिभेचा वापर करावा लागेल.

Prime Minister Narendra Modi & Joe Biden
UNGA: एस जयशंकर यांची अनेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत बैठक ,अफगाणिस्तानवर चर्चा

आधी भेटले होते

यापूर्वीही दोघांची भेट झाली होती त्यावेळी बायडन त्यावेळी ते अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पंतप्रधान मोदींशी त्यांची ही पहिली भेट आहे. बायडन यांनी या वर्षी जानेवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती जो बायडन फोनवर अनेक वेळा बोलले आहेत. दोघांनीही व्हर्चुअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता. यात मार्चमध्ये आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परिषदेचा समावेश होता. पंतप्रधान मोदी आणि जो बायडन यांच्यात शेवटचे दूरध्वनीवरुन संभाषण 26 एप्रिल रोजी झाले होते.

पीएम मोदींनी सातव्यांदा अमेरिकेला भेट दिली

2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी 7 व्यांदा अमेरिकेला भेट दिली आहे. या बैठकीपूर्वी अध्यक्ष बायडन यांनी ट्वीट करुन म्हटले, 'आज सकाळी मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठकीसाठी होस्ट करत आहे. मी दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी, मुक्त आणि खुले इंडो-पॅसिफिक प्रदेशातील संबंधाबरोबर हवामान बदलापर्यंतच्या प्रत्येक समस्येचा सामना करण्यासाठी उत्सुक आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com