आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर देशातील वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. सत्ताधारी मोदी सरकारला या मुद्यावरुन घेरले जात आहे. देशात बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे का? निवडणुकीच्या वातावरणात बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे का? खरे तर, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) रिपोर्टमध्ये भारतातील रोजगाराच्या स्थितीबाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे देशातील एकूण बेरोजगारांपैकी 83 टक्के तरुण आहेत. चला तर मग या रिपोर्टविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...
दरम्यान, ILO ने इंस्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट (IHD) च्या सहकार्याने 'इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024' प्रकाशित केला आहे. त्यानुसार भारतात 100 लोक बेरोजगार असतील तर त्यातील 83 तरुण आहेत. यामध्येही बहुतांश तरुण सुशिक्षित आहेत.
देशातील एकूण बेरोजगार तरुणांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या 2000 च्या तुलनेत आता दुप्पट झाल्याचेही आयएलओच्या रिपोर्टमध्ये उघड झाले आहे. 2000 मध्ये सुशिक्षित तरुण बेरोजगारांची संख्या एकूण तरुण बेरोजगारांच्या 35.2 टक्के होती. 2022 मध्ये ती 65.7 टक्के झाली. यामध्ये केवळ दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या सुशिक्षित तरुणांचा समावेश करण्यात आला आहे.
आयएलओचा रिपोर्ट जाहीर होण्याच्या एक दिवस आधी, देशाचे माजी आरबीआय गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन म्हणाले होते की, भारतातील लोकांनी आपली इकॉनॉमिक ग्रोथ चांगली असल्याच्या हाइपवर विश्वास ठेवू नये, असे करणे ही एक मोठी चूक ठरेल. त्याऐवजी, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेतील मूलभूत समस्या, जसे की आपली शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे. आयएलओनेही आपल्या रिपोर्टमध्ये असे काहीसे म्हटले आहे. ILO ने म्हटले की, भारतात 10वी नंतर शाळा सोडण्याचे प्रमाण अजूनही उच्च पातळीवर आहे, विशेषतः गरीब राज्यांमध्ये. उच्च शिक्षणाच्या बाबतीत देशांतर्गत प्रवेशाचे प्रमाण खूप आहे, परंतु या ठिकाणी शिक्षणाचा स्तर चिंताजनक आहे. भारतातील मुलांची शिकण्याची क्षमता शालेय ते उच्च शिक्षण पातळीपर्यंत कमी आहे.
दरम्यान, वेजेसच्या संदर्भातही एक गोष्ट रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहे. 2019 पासून, नियमित कामगार आणि स्वयंरोजगार असलेल्या लोकांच्या उत्पन्नात घट होत आहे. त्याचवेळी, अनस्किल्ड लेबर फोर्समध्ये कॅज्युअल वर्कर्संना 2022 मध्ये किमान वेतन मिळालेले नाही. काही राज्यांमध्ये रोजगाराची स्थिती अत्यंत दयनीय आहे. बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड ही राज्ये आहेत. भारतासाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. भारतातील सुमारे 27 टक्के लोकसंख्या तरुणांची आहे, परंतु त्यातील मोठा भाग बेरोजगार आहे. अशा परिस्थितीत भारताला आपल्या डेमॉग्राफिक डिव्हिडंटचा लाभ म्हणावा तसा मिळत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.