युरोपीय देश युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. सॅटेलाइट चित्रांवरून असे दिसून आले आहे की त्यांच्याकडे तोफ आणि क्षेपणास्त्रासारख्या प्रगत शस्त्रास्त्रांपासून सर्वकाही आहे. रशिया कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिका आणि युक्रेनला आहे. संपूर्ण युरोपमध्ये हाय अलर्टसारखी परिस्थिती आहे. तणाव कमी करण्यासाठी अमेरिका (America) रशियासोबत (Russia) सातत्याने बैठका घेत आहे. जर तुम्हाला या प्रकरणातील काही माहिती नसेल तर ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला प्रत्येक माहिती मिळेल.
रशियाने सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्याचे अमेरिकेला कळल्यावर गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी नाटोने रशियाला 'आक्रमक कारवाई' करण्याचा इशारा दिला होता. पाच महिन्यांपूर्वी, युक्रेनने त्याच्या सर्वात मोठ्या शेजारी रशियावर पूर्व सीमेवर आणि क्रिमियामध्ये सैन्य गोळा करण्याचा आरोप केला होता. तोच क्रिमिया जो 2014 पासून रशियाच्या ताब्यात आहे. देशाच्या पूर्वेकडील भागात हिंसाचार आणि हल्ल्यांनंतर रशियन समर्थित फुटीरतावाद्यांनी युक्रेनचा भूभाग ताब्यात घेतला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पाश्चात्य देशांवर "युक्रेनला आधुनिक शस्त्रे पुरवल्याचा" आणि प्रक्षोभक लष्करी सराव केल्याचा आरोप केला आहे.
28 नोव्हेंबर रोजी युक्रेनने सांगितले की रशिया जानेवारीच्या उत्तरार्धात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला आक्रमणासाठी सुमारे 92,000 सैन्य तयार करत आहे. रशियाने हा दावा ठामपणे नाकारला आणि तीन दिवसांनी युक्रेनवर स्वतःचे सैन्य तैनात केल्याचा आरोप केला. तसेच तो कधीही नाटोमध्ये सामील होणार नाही याची "कायदेशीर हमी" देण्याची मागणी केली. तर युक्रेनला रशियाच्या कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडी नाटोमध्ये सामील व्हायचे आहे.
7 डिसेंबर रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी पुतीन यांना इशारा दिला की जर रशियाने युक्रेनवर कब्जा केला तर त्यांच्यावर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील. पण अमेरिकेने युक्रेनला मदत करण्यासाठी आपले सैन्य पाठवण्यास नकार दिला. यादरम्यान, पुतिन यांनी पुन्हा एकदा नाटोचा पूर्वेकडे विस्तार करू नये, असा पुनरुच्चार केला. 16 डिसेंबर रोजी, EU आणि NATO ने "युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेबद्दल आणि हल्ला केल्यास मोठ्या परिणामांचा" इशारा दिला आहे. दुसऱ्या दिवशी मॉस्कोने माजी सोव्हिएत देशांवर अमेरिकन प्रभाव मर्यादित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
28 डिसेंबर रोजी, अमेरिका आणि रशियाने युरोपमधील सुरक्षेवर चर्चेची घोषणा केली आणि दोन दिवसांनंतर, बिडेन यांनी पुतीन यांना इशारा दिला आणि सांगितले की सैन्य मागे घेतल्यासच चर्चा पुढे जाऊ शकते. या वर्षाच्या 2 जानेवारी रोजी, बिडेन यांनी युक्रेनला आश्वासन दिले की रशियाने हल्ला केल्यास वॉशिंग्टन आणि त्यांचे सहयोगी "निर्णायक प्रत्युत्तर" देतील. तीन दिवसांनंतर, EU परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेलने फ्रंटलाइनला भेट दिली. तसेच युक्रेनला पूर्ण पाठिंबा देण्याचे सांगितले. 8 जानेवारी रोजी व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिका रशियासोबत क्षेपणास्त्र प्रणाली आणि लष्करी सरावांवर चर्चा करण्यास तयार आहे.
10 जानेवारी रोजी, यूएस आणि रशियन अधिकाऱ्यांनी जिनिव्हा येथे एका आठवड्याची चर्चा सुरू केली. दोन दिवसांनंतर, नाटो-रशिया कौन्सिलच्या बैठकीत नाटो आणि रशियाने युक्रेनवर चालू असलेल्या मतभेदांवर चर्चा केली. त्यानंतर 14 जानेवारीला युक्रेन सरकारच्या अनेक वेबसाइट हॅक झाल्याची बातमी आली. युक्रेनने यामागे रशियाचा हात असल्याचे सांगितले. त्याच दिवशी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी रशियावर 'फॉल्स फ्लॅग' ऑपरेशन चालवल्याचा आरोप केला. म्हणजेच रशियाने एक प्रकारे युद्धाची तयारी केली आहे. रशियानेही हा मुद्दा फेटाळून लावला. यानंतर रशियाने आपल्या मित्र देश बेलारूसमध्ये आपले सैन्य पाठवले आणि सांगितले की हे लष्करी सरावासाठी करण्यात आले आहे. तर युक्रेनने सांगितले की ते सर्व बाजूंनी घेरण्याची तयारी करत आहे. युक्रेन वाद सोडवण्यासाठी सध्या अमेरिका आणि रशियाच्या अधिकाऱ्यांसेबत नियमित बैठका घेत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.