Turkey-Syria Earthquake: भारताचा दीपेंद्र बनला 'मसिहा', पीडीतांच्या मदतीसाठी उचलले 'हे' पाऊल

Turkey-Syria Earthquake: तुर्कीमध्ये कैपेडोकिया शहरात दीपेंद्र 'नमस्ते इंडिया' नावाचे हॉटेल चालवतो .त्याचबरोबर त्याचे दोन रेस्टॉरंटदेखील आहे.
Turkey-Syria Earthquake
Turkey-Syria EarthquakeDainik Gomantak
Published on
Updated on

Turkey-Syria Earthquake: सीरीया-तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामध्ये अजूनही मृतांची संख्या वाढतच आहे. भूकंपात झालेली जीवीतहानी पाहून संपूर्ण जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

आता भारतातील दीपेंद्र तुर्कीमध्ये मसिहा बनल्याचे म्हटले जात आहे. तुर्कीमध्ये कैपेडोकिया शहरात दीपेंद्र 'नमस्ते इंडिया' नावाचे हॉटेल चालवतो त्याचबरोबर त्याचे दोन रेस्टॉरंटदेखील आहे.

सध्या दीपेंद्र भूकंपामध्ये अडकलेल्या लोकांना मदत करण्यामध्ये 24 तास गुंतला आहे. भूकंपात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी दीपेंद्रने आपल्या हॉटेलचे दरवाजे खुले केले आहेत. पीडीतांना दीपेंद्र मोफत जेवण देत आहेत व काहीजण त्यांच्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. पीडीतांना मदत करण्याचा त्याने हे पाऊल उचलले आहे.

सीरीया -तुर्की( Turkey )च्या भूकंपात 21 हजार लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे.या संकटाच्या काळात अनेक देशांनी सीरीया -तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारताने सुद्धा ऑपरेशन दोस्त अंतर्गत 6 विमानांमधून अत्यावश्यक संसाधने आणि मोबाइल हॉस्पीटल सहित एनडीआरएफ ची टीम पाठवल्या आहेत. याशिवाय तुर्कीमध्ये राहत असलेले भारतीय मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

Turkey-Syria Earthquake
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानला पुन्हा मोठा धक्का, बेलआउट पॅकेजबाबत अंतिम निर्णय...!

दीपेंद्र गेल्या 10 वर्षांपासून कैपेडोकिया शहरात राहत आहे. भूकंप झालेल्या क्षेत्रापासून 220 किलोमीटर दूर राहत असल्याचे दीपेंद्र म्हटले आहे. 30 भूकंपपीडीत लोक त्याच्या नमस्ते इंडिया( India ) या हॉटेलमध्ये राहत आहेत याबरोबरच 60 लोकांना तो मोफत जेवण देत असल्याचे म्हटले आहे.

जर कोणाला मेडिकलची गरज लागली तर त्यासुविधादेखील पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत असे दीपेंद्र यांनी म्हटले आहे. काही लोक फक्त बिस्किट खाऊन जगत आहेत. दीपेंद्रच्या म्हणण्यानुसार, भूकंपप्रवण क्षेत्राकडून कैपेडोकियाकडे येणाऱ्या पीडीत लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, दीपेंद्रच्या या मदतीच्या कार्यामुळे त्याला मसिहा म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com