तुम्ही पोलंडचे (Poland) नाव ऐकले असेलच. त्याचबरोबर तुम्ही या देशाला एकदा तरी भेट दिली असणार. परंतु पोलंडची राजधानी वॉर्सा (Warsaw) येथील चौकाला जामनगरचे महाराज दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांच्या नाव देण्यात आले आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? ही कथा भारतातील वसुधैव कुटुंबकम या तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे. चर्चा आहे दुसऱ्या महायुद्धाची, जेव्हा 1939 मध्ये जर्मन आणि रशियन सैन्याने (Russian troops) पोलंडवर कब्जा केला होता. या युद्धात हजारो पोलिश सैनिक मारले गेले.
दरम्यान, 1941 पर्यंत पोलिस मुले पोलंडमधील कॅम्पमध्ये राहत होती, परंतु त्यानंतर रशियाने मुलांना तेथून हाकलण्यास सुरुवात केली. त्यानंतर 600 हून अधिक मुले त्यांचे जीव वाचवण्यासाठी निघाले होते. परंतु शेजारील देशांनी त्यांना आश्रय देण्यास नकार दिला. जेव्हा त्यांची बोट मुंबईत पोहोचली तेव्हा जामनगरचे महाराज दिग्विजय सिंह यांनी औदार्य दाखवत आश्रय दिला. तेव्हा भारत गुलाम होता आणि इंग्रजांनीही मुलांना आश्रय देण्यास नकार दिला.
दरवर्षी पोलंडमधील लोक भारतातील बालाचडी गावात येतात
1946 पर्यंत पोलंडची निर्वासित मुले जामनगरपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बालाचडी (Balachadi) गावात राहत होती आणि त्यानंतर पोलंड सरकारने त्यांना परत बोलावले. 1989 मध्ये पोलंड रशियापासून वेगळे झाले तेव्हा येथील लोकांनी कृतज्ञता म्हणून जाम साहेबांचे नाव दिले. आजही पोलंडमधील लोक दरवर्षी भारतातील बालाचडी गावात येतात आणि दुसऱ्या महायुद्धात ज्या भूमीने आपले प्राण वाचवले त्या भूमीला आदरांजली वाहतात.
दरम्यान, पोलंड आणि रशियाचा मित्र देश असलेल्या बेलारुस यांच्यात युद्धाचा होण्याचा धोका होता. सीमेवर अधिक सैन्य तैनात केल्याची बातमी समजताच, पोलंडनेही आपल्या सीमेवर 15,000 सशस्त्र सैनिक तैनात केले होते. मात्र पोलंडचा आरोप होता की, बेलारुस आपल्या सीमेवर येणाऱ्या निर्वासितांना शस्त्रे पुरवत आहे. जेणेकरुन ते बळजबरीने पोलंडमध्ये प्रवेश करु शकतील. अशा परिस्थितीत सोमवारी पोलंडचे सैनिक निर्वासितांविरोधात काही मोठे पाऊल उचलू शकतात, असे बोलले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे निर्वासित मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील देशांतून आले आहेत. या लोकांना चांगले जीवन जगण्यासाठी युरोपमध्ये स्थायिक व्हायचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.