चंद्र बनणार मानवाचे दुसरे निवासस्थान! 'मातीपासून होणार ऑक्सिजन तयार...'

चंद्रावरील (Moon) मातीचा वापर पाणी आणि कार्बन डायऑक्साइडचे ऑक्सिजनमध्ये रुपांतर करण्यासाठी केला जाऊ शकतो.
Moon
MoonDainik Gomantak

चंद्रावरील मातीचा वापर पाणी आणि कार्बन डायऑक्साइडचे ऑक्सिजनमध्ये रुपांतर करण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय हायड्रोजन आणि मिथेनसारखे इंधनही मातीतून तयार करता येते. या गोष्टी ऊर्जेचा स्त्रोत म्हणून वापरता येतात. तसेच, ते राहण्यायोग्य भागात श्वास घेण्यासारखे वातावरण देऊ शकतात. (The moon will become the second home of man Oxygen will be formed from the surface soil)

दरम्यान, चीनच्या नानजिंग युनिव्हर्सिटीचे साहित्य शास्त्रज्ञ प्रोफेसर यिंगफांग याओ म्हणाले, "भविष्यात, आम्ही स्पेसफ्लाइट उद्योग वेगाने विकसित होताना पाहू." हे अगदी 16 व्या शतकातील 'एज ऑफ सेल' सारखे असेल, जेव्हा शेकडो जहाजांनी समुद्रात प्रवास सुरु केला होता. परंतु आपण 'एज ऑफ स्पेस'कडे वाटचाल करु.

Moon
Johnny Depp-Amber Controversy: एम्बर हर्ड म्हणाली, 'तो माझ्या प्राइवेट पार्ट...'

प्रोफेसर यिंगफांग याओ म्हणाले की, ''परंतु जर आपल्याला बाह्य जगाचा मोठ्या प्रमाणावर शोध घ्यायचा असेल, तर आपल्याला पृथ्वीवरुन (Earth) बाहेर काढलेला पेलोड कमी करण्याचा विचार करावा लागेल. याचा अर्थ आपल्याला शक्य तितक्या कमी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागेल आणि अवकाशात उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करावा लागेल.''

दरम्यान, प्रोफेसर यिंगफांग याओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशी प्रणाली तयार केली आहे, जी पृथ्वीवरुन वस्तू आणण्यापेक्षा चंद्रावरील मुबलक संसाधनांवर अवलंबून असेल. विशेषतः चंद्राची माती आणि सौर विकिरण. ते म्हणाले की, आम्ही रॉकेट पेलोड कमी करण्यासाठी तिथे उपलब्ध पर्यावरण संसाधनांचा वापर करतो. पृथ्वीबाहेर शाश्वत आणि स्वस्त वातावरण निर्माण करणे हे आमचे धोरण आहे.

Moon
जगातील तिसरे सर्वोच्च शिखर कांचनगंगा सर करताना भारतीय गिर्यारोहक नारायण अय्यर यांचे निधन

तसेच, संशोधकांनी चीनच्या (China) चांगई 5 यानाने पृथ्वीवर परत आणलेल्या चंद्राच्या मातीचे विश्लेषण केले आहे. प्रोफेसर यिंगफांग याओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे आढळून आले की, मातीच्या नमुन्यांमध्ये विविध प्रकारचे कंपाउंड आहेत, ज्यांचा वापर चंद्रावर मानवांना स्थिर करण्यासाठी केला जाऊ शकतो. निकालांच्या आधारे, टीमने 'एक्स्ट्राटेरेस्ट्रियल फोटोसिंथेसिस' नावाची प्रणाली प्रस्तावित केली आहे.

'एक्स्ट्राटेरेस्ट्रियल फोटोसिंथेसिस' प्रणालीद्वारे, चंद्राच्या मातीत सापडलेल्या कंपाउंडचा वापर पाण्याचे इलेक्ट्रोलायझ करण्यासाठी केला जाईल. याशिवाय, चंद्रावरील मातीचा वापर अंतराळवीरांनी सोडलेला कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजनसह (Hydrogen) एकत्र करुन मिथेनसारखे हायड्रोकार्बन तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्याचा वापर इंधन म्हणूनही केला जाऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com