Italy: 'प्लेबॉय इमेज, मुलींसोबत सेक्स...', सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेल्या सिल्वियो बर्लुस्कोनी यांचे निधन

Former Prime Minister Silvio Berlusconi: पार्टीचे शौकीन आणि भ्रष्टाचाराचे आरोप असूनही बर्लुस्कोनी हे इटलीचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले.
Former Prime Minister Silvio Berlusconi
Former Prime Minister Silvio BerlusconiDainik Gomantak
Published on
Updated on

Former Prime Minister Silvio Berlusconi: प्लेबॉय इमेज, अनेक मुलींसोबत सेक्स, भ्रष्टाचाराचे आरोप, बुंगा-बुंगा पार्टी आयोजित करण्याच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिलेल्या सिल्वियो बर्लुस्कोनी यांचे सोमवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.

पार्टीचे शौकीन आणि भ्रष्टाचाराचे आरोप असूनही बर्लुस्कोनी हे इटलीचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले. बर्लुस्कोनी यांना रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी गेल्या काही महिन्यांत दुसऱ्यांदा शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांना अनेक वर्षांपासून हृदयविकार, प्रोस्टेट कॅन्सरचा त्रास होता. 2020 मध्ये कोविड-19 ची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते.

बुंगा-बुंगा पार्टीशी संबंधित नाव

इटलीचे (Italy) माजी पंतप्रधान बर्लुस्कोनी यांचे शौकच निराळे होते. 2011 मध्ये त्यांच्याविरुद्ध वेश्याव्यवसायात गुंतल्याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला होता. याशिवाय बर्लुस्कोनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर बुंगा-बुंगा पार्टीत सामील झाल्याचा आरोप होता.

मुलींना मिलानमधील त्यांच्या लक्झरी व्हिलामध्ये नग्न नृत्य करण्यासाठी युरोमध्ये पैसे दिल्याचा दावा केला जातो. विशेष म्हणजे, बुंगा-बुंगा हे आफ्रिकन शैलीतील नृत्य आहे.

तपासादरम्यान त्यांचे रेकॉर्डिंग देखील समोर आले होते, ज्यानुसार बर्लुस्कोनी यांनी अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा केला गेला.

Former Prime Minister Silvio Berlusconi
Italy Floods: इटलीत मुसळधार पावसामुळे विध्वंस; 8 जणांचा मृत्यू; हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

सेक्ससाठी पैसे दिल्याचा आरोप

दरम्यान, 2011 मध्ये गार्डियनने या प्रकरणाची चौकशी केली होती. बर्लुस्कोनी यांनी महिलांना सेक्ससाठी पैसे दिल्याचा पुरावा होता. 2009 मध्ये बर्लुस्कोनी आणि सह-आरोपी उद्योजक जियानपाओलो तारांटिनी यांच्यातील संभाषणही समोर आले होते. \

त्यात बर्लुस्कोनी हे तारांटिनी यांना सांगत होते की, त्यांना योग्य मोबदला दिला जातो. इतकेच नाही तर बर्लुस्कोनी आदल्या रात्री किती महिलांसोबत होते याबद्दलही बढाया मारत होते.

ते म्हणत होते की, काल रात्री माझ्या बेडरुमच्या दाराबाहेर रांग लागली होती. 11 च्या आसपास, मी फक्त आठ महिलांबरोबर संबंध ठेवले, कारण मी ते आता करु शकत नाही.

1936 मध्ये जन्म

बर्लुस्कोनी यांचा जन्म 29 सप्टेंबर 1936 रोजी मिलान येथे झाला, ते एका मध्यमवर्गीय बँकरचे पुत्र होते. त्यांनी लॉ चे शिक्षण घेतले होते. बर्लुस्कोनी यांनी वयाच्या 25 व्या वर्षी एक बांधकाम कंपनी सुरु केली होती. त्यांनी मिलानच्या बाहेरील भागात मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अनेक अपार्टमेंट बांधले.

Former Prime Minister Silvio Berlusconi
Blast In Italy: इटलीच्या मिलानमध्ये भीषण स्फोट, अनेक वाहने जळून खाक!

विविध पैलू

बर्लुस्कोनी तीन वेळा पंतप्रधान राहिलेले एक सक्षम आणि करिष्माई राजकारणी होते, ज्यांनी इटलीला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी, टीकाकारांसाठी ते एक लोकप्रियतावादी होते, ज्यांनी स्वत:ला आणि त्यांचे व्यवसाय समृद्ध करण्यासाठी राजकीय शक्तीचा वापर करुन लोकशाहीला कमजोर करण्याचा प्रयत्न केला.

त्यांचा 'फोर्झा इटालिया' हा राजकीय पक्ष सध्याच्या पंतप्रधान ज्योर्जिया मेलोनी यांच्यासोबत युतीचा भागीदार होता, जो गेल्या वर्षी सत्तेवर आला होता. जरी त्याला सरकारमध्ये कोणतेही स्थान नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com