
शाहरुख खान आणि दीपिका पादूकोणचा पठाण चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात दोघेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत होते. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये ट्रेलरची उत्सुकता होता. हा ट्रेलर 10 जानेवारी रिलीज करण्यात आला. आता दुबईमधील प्रसिद्ध (Dubai) बुर्ज खलिफावर हा ट्रेलरची झलक दाखवण्यात आली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
इंस्टाग्रामवर (Instagram) यशराज फिल्मने दुबईमधील या इवेंटचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये (Video) बुर्ज खलिफावर पठाणचा ट्रेलर दाखवण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच शाहरुखच्या एण्ट्रीला तेथे उपस्थित असणारे लोक ओरडताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
पठाण ट्रेलरमध्ये शाहरुखचे दमदार अॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत. शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) सिक्स पॅक अॅब्स तर, दीपिका पदुकोण देखील खूपच सुंदर दिसत आहे. दीपिका हातात बंदूक घेऊन स्टंट करताना दिसत आहे. तर, जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात (Movie) जॉन इब्राहिम देखील मुख्य भूमिका दिसणार आहे. या अॅक्शन थ्रीलर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.