Happiness Ministry: रशियन महिला खासदाराने मांडला अनोखा प्रस्ताव; म्हणाल्या, 'हॅपीनेस मिनिस्ट्री बनवा...'

Russian MP Valentina Matviyenko: रशिया-युक्रेन युद्ध अजूनपर्यंत थांबलेले नाही. यातच आता, रशियाच्या महिला खासदार आपल्या एका वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत.
Russian MP Unique Proposal Said Happiness Ministry Should Be Created
Russian MP Unique Proposal Said Happiness Ministry Should Be CreatedDainik Gomantak
Published on
Updated on

Russian MP Unique Proposal Said Happiness Ministry Should Be Created: रशिया-युक्रेन युद्ध अजूनपर्यंत थांबलेले नाही. यातच आता, रशियाच्या महिला खासदार आपल्या एका वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. रशियन खासदार वेंलेंटीना मतवियेंको यांनी आपल्या देशात 'मिनिस्ट्री ऑफ हॅपीनेस' स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याला आता 20 महिने उलटले आहेत. दरम्यान, मॉस्कोमध्ये एका एज्युकेशन एक्स्पोमध्ये भाषणादरम्यान वेंलेंटीना मतवियेंको यांनी हॅपीनेस मंत्रालयाची मागणी केली.

वेंलेंटीना मतवियेंको यांनी त्यांच्या भाषणादरम्यान सांगितले की, 2019 मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या भेटीदरम्यान त्यांना ही कल्पना सुचली. द इनसाइडरच्या म्हणण्यानुसार, वेंलेंटीना मतवियेंको म्हणाल्या की, तातडीने हॅपीनेस मंत्रालय स्थापन करावे. मी रशियामध्ये (Russia) हॅपीनेस मंत्रालयाची तयार करण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे.

Russian MP Unique Proposal Said Happiness Ministry Should Be Created
रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास War! युद्धाचे नियम काय असतात? काय सांगतो आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा?

मतवियेंको पुढे म्हणाल्या की, हॅपीनेस मंत्रालय सर्व निर्णय आणि कायद्यांचे पुनरावलोकन करेल आणि कोणताही नवीन आदेश किंवा कायदा लोकांना किती आनंद देऊ शकेल हे पाहेल. आतापर्यंत माझ्याकडे या अनोख्या मंत्रालयाला पाठिंबा देण्यासाठी एक समूह आला आहे. तुम्हीही मंत्रालयाच्या प्रस्तावाला पाठिंबा देऊ शकता.

हे मंत्रालय UAE, भूतान आणि व्हेनेझुएलामध्ये आहे

अहवालानुसार, हॅपीनेस मंत्रालय यूएई (UAE) आणि व्हेनेझुएलामध्ये अस्तित्वात असून उत्तमरित्या काम करत आहे. हे मंत्रालय 2016 मध्ये UAE मध्ये तयार करण्यात आले होते. याच्या उद्दिष्टामध्ये देशातील सर्वांगीण जीवनशैलीला प्रोत्साहन देणारी धोरणे आणि कार्यक्रम विकसित करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे समाविष्ट होते. UAE च्या आगोदर हॅपीनेस मंत्रालय 2013 मध्ये व्हेनेझुएलामध्ये स्थापन करण्यात आले.

Russian MP Unique Proposal Said Happiness Ministry Should Be Created
Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाबाबत नास्त्रेदमसची मोठी भविष्यवाणी, जाणून घ्या...

दुसरीकडे, मध्य प्रदेशात 2016 मध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने हॅपीनेस डिपार्टमेंटची स्थापना केली होती. असे करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य होते. त्यावेळी, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले होते की, भूतानच्या धर्तीवर सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी हे डिपार्टमेंट काम करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com