रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास War! युद्धाचे नियम काय असतात? काय सांगतो आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा?

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. सर्वप्रथम हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. सर्वप्रथम हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. यानंतर इस्रायलने हमासला चोख प्रत्युत्तर दिले. हमासची पाळेमुळे गाझामधून उखडून टाकण्याची खूनगाठ इस्रायलने बांधली आहे.

दुसरीकडे मात्र, इस्रायलने (Israel) कितीही भयंकर हल्ला केला तरी त्याला युद्धाचे नियम पाळावेच लागतील. हे युद्ध नियम तयार करण्यासाठी 1864 मध्ये पुढाकार घेण्यात आला होता. युद्धादरम्यान देश काय करु शकतो आणि काय करु शकत नाही हे जाणून घेऊया?

दरम्यान, जगातील सर्व देशांनी संयुक्तपणे युद्धाचे नियम बनवले आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा (IHL) म्हणतात. युद्धाच्या वेळी देश एकमेकांविरुद्ध काय करु शकतात आणि काय करु शकत नाहीत हे युद्धाच्या नियमांद्वारे ठरवले जाते.

रेड क्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांच्या पुढाकाराने 1864 मध्ये पहिल्यांदा जिनेव्हा अधिवेशनात युद्धाचे नियम बनवण्याची मोहीम सुरु करण्यात आली होती. त्यावेळी फक्त 12 देशांनी यावर सहमती दर्शवली होती, पण आज 196 देशांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: इस्रायलची मोठी कारावाई, 60 दहशतवादी ठार; 250 ओलिसांची केली सुटका

युद्धाच्या नियमांनुसार कोणताही देश युद्धादरम्यान दुसऱ्या देशाच्या नागरिकांना लक्ष्य करु शकत नाही. याशिवाय वैद्यकीय कर्मचारी, आरोग्यसेवा कर्मचारी आणि युद्धात भाग न घेणाऱ्या लोकांना कोणतीही इजा होणार नाही. ते कुठेतरी संघर्षात अडकले तरी त्यांना सुरक्षितपणे तिथून जावू देण्याची संधी दिली जाते.

दरम्यान, युद्धबंदी झालेल्या लोकांना आदराने वागवले जाईल. त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत.

याशिवाय अपमान होणार नाही. पकडलेल्या शत्रू सैनिकांना अन्न आणि पाणीही दिले जाईल. याशिवाय वैद्यकीय कर्मचारी शत्रू देशातून आलेला सैनिक असला तरी त्याच्यावर उपचार करतील. यामुळे लोक आणि घरांना लक्ष्य केले जाणार नाही.

युद्धादरम्यान शत्रू देशाच्या महिलांवर (Women) लैंगिक अत्याचार होणार नाहीत. कोणताही सैनिक असे करताना आढळल्यास तो युद्ध गुन्हा (War Crime) मानला जाईल. असे झाल्यास त्या देशावर कारवाई होऊ शकते.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: हमाससोबत सुरु असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री इस्रायलमध्ये दाखल, 'ही' मोठी मागणी...

याशिवाय, युद्धात रासायनिक आणि जैविक शस्त्रांच्या वापरावरही बंदी आहे. याला बेकायदेशीर म्हटले आहे. जर कोणत्याही देशाने ही घातक शस्त्रे वापरली तर तो युद्ध गुन्हा (War Crime) म्हणून गणला जातो. इतर देश अशा देशावर कारवाई करु शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com