'कॅनडामध्ये प्रदर्शन करणाऱ्यांच्या अधिकाराचा आदर करा'

अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने (US based Hindi Organization) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांना शांततेने आंदोलन करण्याच्या लोकांच्या अधिकाराचा आदर करावा, असे आवाहन केले आहे.
Justin Trudeau
Justin TrudeauDainik Gomantak

कॅनडा (Canada) सध्या कोरोना निर्बंधांविरोधात मोठी झुंज देत आहे. यातच ट्रकचालकांच्या (Truckers) नेतृत्वाखाली आंदोलकांनी कॅनडाची राजधानी असणाऱ्या ओटावामध्ये (Ottawa) ट्रक अडवून कॅनडा-अमेरिका क्रॉसिंग (US-Canada Border) रोखले आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कॅनडाला आपत्कालीन कायदा (Emergency Act) लागू करावा लागला. यास प्रत्युत्तर देताना अमेरिकेतील (America) एका हिंदू संघटनेने (US based Hindi Organization) कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांना शांततेने आंदोलन करण्याच्या लोकांच्या अधिकाराचा आदर करावा, असे आवाहन केले आहे. (Respect The Rights Of Protesters In Canada)

दरम्यान, हिंदूपॅक्ट संस्थेचे कार्यकारी संचालक उत्सव चक्रवर्ती (Utsav Chakravarti) म्हणाले, “कॅनडातील निदर्शने ज्या पध्दतीने दडपली जातायेत हे ऐकून मला वाईट वाटत आहे. तिथली परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून आम्ही सर्वजण आमच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी खूप चिंतित आहोत.''

Justin Trudeau
Video: युक्रेनच्या राष्ट्रपतींनी पत्नीसोबत दिला जगाला प्रेमसंदेश

हिंदूपॅक्टने एक निवेदन जारी करुन ट्रुडो यांना शांततेने निषेध करण्याच्या कॅनडाच्या लोकांच्या अधिकाराचा आदर करावा असे आवाहन केले आहे. कोणत्याही लोकशाहीत शांततापूर्ण निषेध करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे हिंदू संघटनेने म्हटले आहे. कॅनडामधील मतभिन्नतेचा आवाज दाबण्यासाठी आणीबाणीच्या आदेशाची घोषणा हे एक दुःखद उदाहरण आहे.

तसेच, हिंदुपॅक्टने ट्रूडो आणि न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे (NDP) नेते जगमीत सिंग यांना "स्वस्तिक" हे नाझी चिन्ह "हकेनक्रेझ" बरोबर न जोडण्याचे आवाहन केले. स्वस्तिक हे हिंदू, बौद्ध अनुयायी, शीख आणि जगभरातील इतर अनेक समुदायांसाठी एक प्राचीन शुभ प्रतीक मानले जाते. ट्रुडो आणि जगमीत सिंग या दोघांनीही अलिकडच्या दिवसांत आंदोलकांसंबंधी विघातक वक्तव्ये केली होती.

Justin Trudeau
पाकिस्तान पुन्हा उतरला तालिबान्यांच्या समर्थनार्थ, जगाला दिला हा संदेश

उत्सव चक्रवर्ती म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की, या खोट्या वक्तृत्वामुळे हिंदू आणि शीख यांच्या विरोधात द्वेषाची भावना निर्माण होईल. कॅनडामध्ये गेल्या महिनाभरात सहा हिंदू मंदिरांची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com