भारतात सामील होण्याचे पीओकेमध्ये झळकले ‘पोस्टर’, काश्मीरी जनता अजूनही रस्त्यावर; शाळा, कार्यालये बंद

Pakistan Occupied Kashmir: पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहेत.
Pakistan Occupied Kashmir
Pakistan Occupied KashmirDainik Gomantak

Pakistan Occupied Kashmir: पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहेत. यातच मागील दोन-तीन दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकार दडपशाही करत आहे. आपल्या मागण्यांसाठी काश्मीरी जनता रस्त्यावर उतरली आहे.

विविध मागण्यांसाठी जनतेचे आंदोलन सुरु आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकार आपल्या मागण्यासाठी मान्य करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान सरकार पाकिस्तान सेनेच्या माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमधील हे आंदोलन थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. सोमवारी पुन्हा एकदा शाळा, कार्यालये बंद ठेवण्यात आली. आंदोलक रस्त्यावरच आहेत. इतकंच नाही तर पीओकेच्या (PoK) रावलाकोटमध्ये भारतात विलीनीकरणाची मागणी करणारे पोस्टर घेऊन लोक बाहेर पडले. भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रांताचा अविभाज्य भाग असलेल्या पीओकेवर कबायलींच्या माध्यमातून हल्ला करुन पाकिस्तानने 1947 मध्ये बेकायदेशीरपणे कब्जा केला. आजतागायत इथले लोक मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत.

Pakistan Occupied Kashmir
Pakistan: बलुचिस्तानमध्ये पुन्हा 7 पंजाबींची हत्या; पाकिस्तानच्या तीन प्रांतात फुटीरतावादाची आग का धगधगतेय?

शुक्रवारपासून गहू आणि विजेच्या गगनाला भिडलेल्या दराविरोधात काश्मीरी जनता आंदोलन करत आहे. दरम्यान, रविवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले, यामध्ये एका उपनिरीक्षक अदनान कुरेशीचा गोळी लागून मृत्यू झाला. याशिवाय सुमारे 100 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीच्या बॅनरखाली हे आंदोलन होत आहे.

हिंसक घटनांमध्ये आमची भूमिका नाही, असे समितीचे म्हणणे आहे. आमची बदनामी करण्यासाठी काही समाजकंटक आंदोलनात शिरले आणि त्यांनी जाणिवपूर्वक आंदोलनाला हिंसक रुप दिले. पाकिस्तान पोलिसांनी आतापर्यंत 70 जणांना अटक केली आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणात अवामी समितीच्या नेत्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात येत आहेत.

दुसरीकडे, गुरुवारी समितीने चक्का जामची हाक दिली होती. त्यानंतर शुक्रवारी लोक रस्त्यावर आले होते. या भागात वीज खूप महाग असल्याने व्यवसाय करणे कठीण होत असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. याशिवाय, गव्हाचे दरही खूप आहेत. पाकिस्तानमध्ये गेल्या दोन वर्षांपासून गहू आणि पेट्रोलसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कमकुवत आर्थिक स्थितीमुळे पाकिस्तानची अवस्था वाईट आहे आणि अशा परिस्थितीत पीओकेसारख्या भागात अराजकता निर्माण झाली आहे.

Pakistan Occupied Kashmir
India Pakistan Trade: पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला भारत देणार आधार? व्यापारासंबंधी शाहबाज सरकामधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

रावलाकोटमधील अनेक आंदोलकांच्या हातात पोस्टर होते यावरुन पीओकेमधील लोकांचा पाकिस्तानविरोधातील संताप आपण समजू शकतो. या पोस्टर्सवर भारतात विलीनीकरणाची मागणी करण्यात आली होती. काही आंदोलकांचे म्हणणे आहे की, आंदोलनाला हिंसक वळण लागले कारण पाकिस्तानी पोलिसांसह सेनेकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला. रावलाकोटशिवाय तट्टापानी, खुईरट्टा, मीरपूर, सेहंसा आणि मुझफ्फराबादमध्ये आंदोलनाची धग जाणवत आहे. पाकिस्तान सरकारने सोमवारी सर्व शैक्षणिक संस्था आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, लोकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com