काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला 'जोर का झटका'; इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी चकार शब्द काढला नाही!

Ebrahim Raisi: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत.
Pakistan PM Shehbaz Sharif Ebrahim Raisi
Pakistan PM Shehbaz Sharif Ebrahim Raisi

Pakistan PM Shehbaz Sharif: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने सोमवारी पाकिस्तानने पुन्हा एकदा इस्लामिक कार्ड खेळले. गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने एकीकडे काश्मीरच्या मुद्द्यावर इराणने समर्थन दिल्याबद्दल आभार मानले, तर दुसरीकडे आपले शतकानुशतके जुने संबंध असल्याचे सांगितले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, इराणसोबतचे आमचे संबंध 76 वर्षांचे नसून शतकानुशतके जुने आहेत. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान 1947 मध्ये अस्तित्वात आला असला, तरी इराणचे या प्रदेशाशी दीर्घकालीन संबंध आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा त्याला मान्यता देणाऱ्यांमध्ये इराण आघाडीवर होता.

एवढेच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी इब्राहिम रायसी यांना आपला बंधू म्हणून संबोधले. रायसी यांना जान-ए-बरदार असे संबोधत शाहबाज शरीफ म्हणाले की, तुम्ही गाझासाठी अशा वेळी आवाज उठवला आहे, जेव्हा जगात कोणीही समर्थन करत नाहीये. एवढेच नाही तर शाहबाज शरीफ यांनी गाझामध्ये मारल्या गेलेल्या 35 हजार लोकांना 'शहीद' म्हटले. याशिवाय, त्यांनी काश्मीरची प्रशंसा करत गाझाशी तुलना केली आणि तिथेही भारताच्या अत्याचारामुळे मुस्लिमांचे रक्त सांडले जात असल्याचे सांगितले. शाहबाज शरीफ यांनी जगभरातील मुस्लिमांना एकजूटता दाखवण्याचे आवाहन केले.

Pakistan PM Shehbaz Sharif Ebrahim Raisi
India Pakistan Trade: पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला भारत देणार आधार? व्यापारासंबंधी शाहबाज सरकामधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

दरम्यान, पाकिस्तानने (Pakistan) एवढ्यावरच न थांबता इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, या मुद्यासंबंधी इराणने पाकिस्तानला जोरदार झटका दिला. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी आपल्या वक्तव्यात गाझाला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानचे आभार मानले. त्यांनी इस्लामिक ऐक्याबद्दलही आपले विचार मांडले, परंतु काश्मीरचा उल्लेखही केला नाही. अशा प्रकारे पत्रकार परिषदेतच पाकिस्तानचा अजेंडा इराणच्या अध्यक्षांनी धुडकावून लावला. त्यांनी उघडपणे इस्लामिक एकतेचा पुरस्कार केला. त्याचबरोबर त्यांनी मुस्लिमांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. मात्र यादरम्यान ते काश्मीरबद्दल काहीच बोलले नाही.

Pakistan PM Shehbaz Sharif Ebrahim Raisi
Pakistan Heavy Rain: बुडत्याचा पाय खोलात! पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे 39 जणांचा मृत्यू; बलुचिस्तानमध्ये आणीबाणी लागू

सौदी अरेबिया, तुर्कस्तान, इराण यांसारख्या मोठ्या मुस्लिम देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान पाकिस्तानचे नेते काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतात. मात्र, सौदी अरेबिया आणि इराणसारख्या देशांकडून त्याला झटका बसला आहे. मात्र, तुर्कस्तानने काश्मीरचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला असून, त्यावर भारतानेही आक्षेप घेतला होता.

विशेष म्हणजे, गाझामध्ये इस्त्रायली हल्ल्यात आतापर्यंत सुमारे 35 हजार लोक मारले गेले आहेत. याशिवाय, इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाची परिस्थिती असून दोघांनी एकमेकांवर थेट हल्ला केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com