Pakistan: पाकिस्तानच्या परमाणू शक्तीबाबत भारताची भीती खरी ठरली

Pakistan: ब्रिटनचे सुरक्षाअधिकारी या सगळ्या प्रकरणाला ॲंटीटेरर ऑपरेशन म्हणून बघत आहेत.
Pakistan
PakistanDainik Gomantak

Pakistan: भारत- पाकिस्तान यांच्यात सातत्याने आरोप - प्रत्यारोप होत असतात.त्याच्यामध्ये दहशतवाद हा महत्वाचा विषय असतो. भारताने नेहमीच पाकिस्तानच्या दहशतवाचा पुरस्कार करण्याच्या भूमिकेला विरोध केला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्याचबरोबरीने याआधी भारताने पाकिस्तानच्या परमाणू बॉंबविषयी चिंता व्यक्त केली होती.आता ही भीती खरी होताना दिसत आहे.

लंडनच्या हीथ्रो विमानतळावर युरेनियमचे पॅकेज पकडण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, याचा संबंध पाकिस्तानबरोबर असल्याचे माहीती दिली आहे. हे पॅकेज इराणला पाठवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काउंटर टेरर पोलिस याचा अधिक तपास करत आहे. टेरर फोर्सने अजूनपर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. ब्रिटनचे सुरक्षाअधिकारी या सगळ्या प्रकरणाला ॲंटीटेरर ऑपरेशन म्हणून बघत आहेत. पाकिस्तान परमाणू बॉंब बनवण्याविषयी काही योजना आखत आहे का याचा तपास करण्यात आला आहे

Pakistan
Elon Musk: कमवलं तेवढं गमवलं! गिनिज बुकमध्ये नावच नोंदवलं

जगामध्ये पाकिस्तान असा देश आहे ज्या देशाकडे परमाणूबॉंब असल्याचा संपूर्ण जगाला भीती आहे. पाकिस्तान आपण स्वत: दहशतवादा( Terrorism)ने त्रस्त असल्याचे सांगत असला तरीही दहशतवादाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. आता पाकिस्तान( Pakistan )चा यात काय संबंध आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com