
पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर बदला घेतला. गेल्या 15 दिवसांपासून देशात संतापाची लाट होती. लोक पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारत कधी बदला घेणार असे विचारत होते. बुधवारी (7 मे) भारताने पाकिस्तान सीमेच्या 100 किमी आत घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले. भारताच्या या धडक कारवाईची पाकिस्तानने आता धास्ती घेतली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये राजकीय नेत्यांसह लष्करी अधिकाऱ्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. भारताने आपल्या कारवाईत लष्कर तोयबासह जैश-ए-मोहम्मदच्या 9 दहशतवादी तळांना टार्गेट केले. याचदरम्यान आता, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांच्या या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
बुधवारी (7 मे) पाकिस्तानचे (Pakistan) संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ब्लूमबर्गशी बोलताना सांगितले की, भारताने परिस्थिती चिघळू देऊ नये. भारताने शांततेच्या दिशेने एक पाऊल टाकले तर पाकिस्तानही वाढता तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करेल.
आसिफ पुढे म्हणाले की, "आम्ही गेल्या दोन आठवड्यांपासून सतत सांगत आहोत की आम्ही कधीही भारतावर हल्ला करणार नाही. पण जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. जर भारताने माघार घेतली तर आम्हीही हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करु." तथापि, भारत-पाकिस्तान चर्चेच्या शक्यतेबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांना अशा कोणत्याही चर्चेची माहिती नाही.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईस "युद्धाची घोषणा" असे म्हटले. शरीफ म्हणाले की, "आमच्या सैन्याला शत्रूला कसे उत्तर द्यायचे हे माहित आहे. पाकिस्तान भारताच्या (India) या कारवाईला योग्य उत्तर देईल. तसेच, शत्रूला त्याच्या मनसुब्यांमध्ये कधीही यशस्वी होऊ देणार नाही."
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला होता, त्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर ही प्रत्युत्तराखल कारवाई केली. यापूर्वी, भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित करणे, अटारी सीमा बंद करणे आणि पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडणे अशी कठोर पावले उचलली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.